Akshaya Tritiya 2026 Shubh Yog: अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. या दिवशी देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते. तसेच सोने खरेदी करण्याचीही परंपरा आहे. अशी धार्मिक श्रद्धा आहे की, अक्षय तृतीयेला केलेल्या कामाचे फळ १३ पट अधिक मिळते. त्यामुळे अक्षय तृतीयेला पूजा, दान आणि इतर धार्मिक कार्ये केली जातात. हा दिवस एक शुभ काळ आहे. या शुभ काळात कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नाही. यंदा अक्षय तृतीयेला एक दुर्मीळ योगायोग घडत आहे.

वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवसाला अक्षय तृतीया म्हणतात. या वर्षी अक्षय तृतीया १९ एप्रिल २०२६ रोजी साजरी केली जाईल. या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही त्यांच्या उच्च राशीत असतील. या वर्षी अक्षय तृतीयेला अनेक दुर्मीळ योग निर्माण होत आहेत. अक्षय तृतीयेला शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे मालव्य राजयोग निर्माण होईल. चंद्रदेखील त्याच्या वृषभ राशीत प्रवेश करेल. अक्षय तृतीयेला गजकेसरी योगदेखील तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, गजकेसरी योग हा सर्वांत शुभ आणि शक्तिशाली फायदेशीर योगांपैकी एक मानला जातो. मालव्य राजयोगदेखील अत्यंत फलदायी मानला जातो. पण, या राजयोगांमुळे कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होईल जाणून घेऊ…

मेष

अक्षय तृतीया हा मेष राशीसाठी अत्यंत फायदेशीर दिवस असेल. करिअरच्या अनेक महत्त्वपूर्ण संधी निर्माण होतील, ज्यामुळे भविष्यात प्रचंड यश मिळेल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.

सिंह

अक्षय तृतीयेला सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या गुंतवणुकीवर भरीव परतावा मिळू शकतो. जमिनीसंबंधीचे जुने प्रश्न सुटून, त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. त्यांना समाजात मान-सन्मानही मिळेल.

वृश्चिक

अक्षय तृतीया हा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एक शुभ दिवस असेल. भाग्याची त्यांना साथ मिळेल. बऱ्याच काळापासून रखडलेला पैसा वसूल होईल. प्रलंबित कामेही कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील.

धनू

अक्षय तृतीया धनू राशीसाठी खूप चांगला दिवस असेल. व्यावसायिकांना नफा होईल. त्यांचे उत्पन्न वाढू शकते. ते नवीन घर किंवा गाडी खरेदी करू शकतात. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल.