Shukra Gochar 2026 Impact on Zodiac Signs: अक्षय्य तृतीया… नावातच ‘अक्षय’ म्हणजे कधीही न संपणारे शुभफल! वैशाख महिन्यातील हा पवित्र दिवस दरवर्षी विशेष मानला जातो. यंदा १९ एप्रिल रोजी येणाऱ्या अक्षय्य तृतीयेचे महत्त्व यंदा अधिकच वाढल्याचे सांगितले जात आहे. कारण- या दिवशी धन, वैभव आणि ऐश्वर्याचे कारक मानला जाणारा शुक्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, अशा ग्रहस्थितीचा काही राशींच्या लोकांवर सकारात्मक परिणाम दिसू शकतो. काहींना अचानक संधी मिळू शकते, तर काहींच्या आयुष्यात नवे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे; पण नेमक्या कोणत्या राशींच्या लोकांना मिळू शकतो हा फायदा? चला जाणून घेऊया…

अक्षय्य तृतीयेपासून ‘या’ राशींवर शुक्रदेवांची कृपा

मेष

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी होणाऱ्या शुक्र गोचरामुळे मेष राशीच्या व्यक्तींना आयुष्यात हलका, पण महत्त्वाचा बदल जाणवू शकतो. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. बराच काळ प्रलंबित असलेली कामे अचानक पूर्णत्वाकडे जाऊ शकतात. धनलाभ होऊ शकतो, नवीन नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते किंवा सध्याच्या नोकरीत पदोन्नतीची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नफ्याच्या नव्या संधी मिळू शकतात. कुटुंबाचा पाठिंबा वाढू शकतो आणि मान-सन्मान मिळण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.

वृषभ

शुक्र ग्रहाचा थेट प्रवेश वृषभ राशीत होत असल्यामुळे हा काळ या राशीसाठी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. आयुष्यात सुखसोई वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. उत्पन्नाचे नवे मार्ग खुलू शकतात, पगारवाढ किंवा अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळू शकते. व्यवसायात वाढ आणि नफा होण्याची शक्यता आहे. जीवनशैलीत सकारात्मक बदल दिसू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून, प्रतिष्ठा आणि सन्मानातही वाढ होऊ शकते.

कन्या

या काळात कन्या राशीच्या व्यक्तींना काही अनपेक्षित, पण आनंददायी घडामोडी अनुभवायला मिळू शकतात. शुक्राच्या प्रभावामुळे आयुष्यात बदलाची चाहूल लागू शकते. धनलाभ होऊ शकतो, नवे उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. नोकरीत बदल किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल होऊ शकतात. नातेसंबंध सुधारू शकतात, विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढू शकतो आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होऊ शकतो.

तूळ

या काळात शुक्राचा प्रभाव तूळ राशीच्या व्यक्तींवर तुलनेने अधिक अनुकूल राहू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जाते. खर्चांवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळू शकते. धनलाभ होण्याची शक्यता असून, मालमत्ता किंवा गुंतवणुकीसाठी चांगली संधी मिळू शकते. व्यवसायात स्थिरता येऊ शकते आणि नफ्याचे प्रमाण वाढू शकते. नोकरीत मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. घरात आनंदी आणि सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते, ज्यामुळे मानसिक समाधान मिळू शकते.

शेवटी लक्षात ठेवा…

अक्षय्य तृतीया हा शुभ काळ मानला जात असला तरी वरील सर्व गोष्टी या ज्योतिषशास्त्रीय शक्यता आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील परिणाम वेगवेगळे असू शकतात. योग्य नियोजन, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यांमुळेच यशाचा मार्ग अधिक सुलभ होऊ शकतो.

कदाचित या अक्षय्य तृतीयेपासून तुमच्या आयुष्यातही नवे अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)