Akshaya Tritiya Horoscope: १९ एप्रिल २०२६, रविवार सकाळी ०७:०९ वाजता चंद्र सूर्याच्या कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करेल. १९ एप्रिललाच अक्षय तृतीया सण आहे. या शुभ दिवशी चंद्र सूर्याच्या नक्षत्रात असल्यामुळे ४ राशींना विशेष लाभ होऊ शकतो. चंद्र २० एप्रिल सकाळी ०४:३४ पर्यंत कृत्तिका नक्षत्रात राहील. या गोचराच्या शुभ प्रभावामुळे आर्थिक लाभ, आत्मविश्वास वाढ, धनप्राप्ती आणि मानसिक शांतता मिळू शकते. या ४ राशी कोणत्या आहेत.
कर्क राशी (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्याच्या नक्षत्रातील चंद्र भाग्य बदलणारा ठरू शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. जुने कर्ज कमी होऊ शकते आणि मानसिक शांतता मिळेल. गुंतवणुकीसाठी हा दिवस शुभ आहे. आत्मविश्वास वाढेल.
सिंह राशी (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांना चंद्र कृत्तिका नक्षत्रात आल्याने अचानक धनलाभ होऊ शकतो. उत्पन्न वाढू शकते. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. नात्यांमध्ये भावनिकता वाढेल. व्यवसायात मोठे निर्णय घेऊ शकतात. जवळच्या व्यक्तीकडून मदत मिळेल. यशाचे योग आहेत.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी चंद्र गोचर लाभदायक ठरू शकतो. अचानक मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढेल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील. मोठी डील होण्याची शक्यता आहे. मोठ्या धनलाभाचे योग आहेत. अडकलेली कामे पूर्ण होतील.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
चंद्र गोचर कुंभ राशीच्या लोकांना चांगले परिणाम देऊ शकतो. कमाई वाढू शकते आणि नोकरीच्या नवीन संधी मिळतील. धनप्राप्तीचे योग आहेत. पैतृक संपत्तीचा लाभ मिळेल. जुनी इच्छा पूर्ण होईल. या काळात मोठ्या आर्थिक नुकसानीपासून बचाव होईल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
