Aajche Rashi Bhavishya 27 February 2026 In Marathi : आज २७ फेब्रुवारी २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी असणार आहे. त्याचबरोबर आयुष्मान योग जुळून येईल आणि आर्द्रा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून ३ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच आज आमलकी एकादशी असणार आहे. भगवान विष्णू तुम्हाला कसा देणार आशीर्वाद चला जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, २७ फेब्रुवारी २०२६ (Daily Horoscope 27 February 2026 In Marathi)

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)

स्वत:बद्दल नसत्या कल्पना बाळगाल. धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ घ्याल. परिस्थिती अनुरूप वागणे ठेवाल. कल्पनाशक्ति योग्य वेळी वापरात आणाल. हुकुमशाहीपणा दूर सारावा.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)

आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधि मिळेल. न्यायी दृष्टीकोन बाळगाल. नवीन विचार आमलात आणावेत. फार कर्मठपणे वागू नये. परोपकाराने वागाल.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. जुनी दुखणी डोके वर काढू शकतात. पारंपरिक कामात यश मिळेल. मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)

जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. आधुनिक विचार आमलात आणून पहावेत. कामे संथगतीने पार पडतील. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. नावलौकिकास पात्र व्हाल.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)

गैरसमजुतीतून वाद निर्माण होवू शकतो. चुकीच्या व्यक्तींमुळे मन:स्ताप होण्याची शक्यता आहे. उगाचच विवंचना लागून राहील. संसर्गजन्य विकारांपासून सावध राहावे. काही गोष्टी स्थिर होण्यास वेळ द्यावा.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)

अत्यंत व्यवहारीपणे वागाल. मनातील संशय दूर सारावा. चिकाटीने कामे कराल. नवीन गोष्टींचे ज्ञान मिळवण्याची इच्छा बाळगाल. इतरांचा विश्वास संपादन करावा.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)

घरातील ज्येष्ठांचा आदर करावा. जवळचा प्रवास जपून करावा. कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढवावे लागेल. आळस बाजूला सारावा लागेल.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)

शांत व खोलवर विचार करावा. काही गोष्टींचे मनन करावे लागेल. चुकीचे निर्णय प्रयत्नाने सुधारावेत. अति महत्त्वाकांक्षा बाळगाल. भावंडांची काळजी लागून राहील.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)

चांगला आर्थिक लाभ होईल. चिकाटीने कामे करून उणीव भरून काढाल. स्वकष्टावर अधिक लक्ष द्याल. काटकसरीने वागणे ठेवाल. शक्यतो मोजकेच शब्द वापरावेत.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)

चटकन निराश होणे टाळावे. परिस्थितीतून मार्ग काढावा. मानसिक स्थैर्य जपावे. स्त्रियांवरून वाद वाढू शकतो. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)

काही गुणांना उशिरा वाव मिळेल. मनातील आशा-निराशा बोलून दाखवाव्या. काही गोष्टींपासून दूर रहावेसे वाटेल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. वेळेचे बंधन पाळावे.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)

कामाची दगदग जाणवेल. थोडा वेळ आपल्यासाठी देखील काढावा लागेल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. कष्टाची योग्य किंमत जाणाल. सतत धडपड करत राहाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर