Daily Horoscope 29 September 2026 In Marathi : आज २९ सप्टेंबर २०२६ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असणार आहे. आज हर्षण योग आणि अश्विनी नक्षत्र जुळून येईल. राहू काळ ७ वाजून ४२ मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजून १२ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजात मुहूर्त ११ वाजून ४७ मिनिटांपासून सुरु होईल ते १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज अंगारकी संकष्टी चतुर्थी असणार आहे. तुमच्या नशिबात बाप्पाचे सुख कसे येणार जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, २९ सप्टेंबर २०२६ (Today Horoscope 29 September 2026 In Marathi )

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

काही प्रश्न मार्गी लावाल. मुलांच्या बाबत चिंता लागून राहील. सामाजिक वादात पडू नका. दिवसभर धावपळ करावी लागेल. गरजूंना मदत केल्याचा आनंद मिळेल.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

कुटुंबासोबत दिवस मजेत घालवाल. बोलण्यातून लोकांना प्रभावित कराल. वरिष्ठांचा चांगला पाठिंबा मिळेल. आर्थिक बाजू स्थिरावेल. कामातील अडचणी दूर करू शकाल.

दैनिक मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

जोडीदाराकडून लाभ होईल. आवडती वस्तु बरेच दिवसांनी सापडेल. आपल्या मनाप्रमाणे दिवस घालवाल. व्यापारात नवीन भागीदार सापडेल. अनेक जबाबदार्‍या पार पाडाल.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. परिस्थिती पाहूनच निर्णय घ्या. कृतीत सामंजस्य आणावे. त्यामुळे मार्ग सहज सापडेल. कुटुंबासाठी खर्च कराल.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

मित्रांकडून अनपेक्षित लाभ संभवतात. सर्व गोष्टीतून आनंद शोधाल. मनातील इच्छा पूर्ण होईल. सहकार्‍यांशी वादात पडू नका. गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

कामातील बदल लक्षात घ्या. घरातील मोठ्यांचे म्हणणे ऐका. सहकारी वर्गाची मदत घ्याल. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी सोडू नका. आर्थिक स्थिती चांगली राहील.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

कामानिमित्त छोटे प्रवास होतील. कामाच्या ठिकाणी वाहवा होईल. मान,सन्मान वाढीस लागेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. विरोधक पराभूत होतील.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

आरोग्याची वेळच्यावेळी काळजी घ्या. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. कार्यालयीन वातावरण चांगले राहील. तुमचा उद्देश साध्य होईल. सारासार विचार करून घेतलेला निर्णय योग्य ठरेल.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

भागीदारी व्यवसायाचे लाभ मिळतील. कामात सहकारी स्वखुशीने मदत करतील. द्विधा मन:स्थितीतील निर्णय पुढे ढकला. वैचारिक दिशा बदलून पहा. भावंडांची मदत घ्याल.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

नवीन नोकरीसाठी बोलावणे येईल. घरात वादग्रस्त प्रसंग टाळा. मेहनतीला पर्याय नाही. कामात झालेले नुकसान भरून काढाल. नवीन योजना आखताना सावधानता बाळगा.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

विद्यार्थ्यांना उत्तम काळ. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. कौटुंबिक जबाबदारी नीट पार पाडाल. नातेसंबंध दृढ होतील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

घरासंबंधी कामे मार्गी लावा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. फटकून बोलू नका. घरातील वातावरण खेळकर राहील. ज्ञान वाढीस लागेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर