Angarki Chaturthi: आज, मंगळवार, २५ जून गणेश संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लक्ष्मी नारायण योग, त्रिग्रही योग, सनफा योग यांसह अनेक लाभदायक योग तयार होत आहेत. मंगळवारची चतुर्थी विशेष मानली जाते, तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची आरधना केली जाते.. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने श्रीगणेश भक्तांचे सर्व संकट दूर करतात. अंगारक संकष्टी तिथी ही गणेशाची उपासना करण्याचा सर्वोत्तम प्रसंग मानला जातो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाचे भक्तिभावाने जप केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे नष्ट होतात. जाणून घ्या कोणत्या ५ राशींसाठी हे सर्व शुभ योग भाग्यशाली परिस्थिती निर्माण करत आहेत.

मेष

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आहे. तुम्ही उर्जेने परिपूर्ण असाल आणि तुमचे काम लवकर पूर्ण कराल. आरोग्यही चांगले राहील. काही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात आनंद मिळेल. कुटुंबात एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता आहे.

वृषभ

आज अनेक फायदे मिळण्याची शक्यता आहे. मालमत्तेतून लाभ होईल. वडिलांधाऱ्या व्यक्तीकडून तुम्हाला फायदा होईल. नोकरीत बदल किंवा नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होईल.

सिंह

अडकलेला पैसा मिळेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तुमचे काम सहज पूर्ण होईल. नवीन काम आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस शुभ आहे. मुलांशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता.

हेही वाचा – संकष्टी चतुर्थी, २५ जून पंचांग: २०२४ च्या एकमेव अंगारकीला मोदक पेढे वाटण्याचा योग आज मेष ते मीनपैकी कोणत्या राशीत

तुळ

आजचा दिवस खूप खास आहे आणि तुम्हाला खूप लाभ देईल. नशीब तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देईल. धनलाभ होण्याची शक्यता राहील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमचे नाते अधिक घट्ट होतील. विवाह निश्चित होऊ शकतो.

धनु
दिवस सर्व बाबतीत सकारात्मक परिणाम देणारा आहे. तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता. मित्रांबरोबर विश्रांतीचा आनंद घ्याल. अडकलेला पैसा मिळेल. कर्जमुक्ती मिळेल. दिवस प्रगतीशील आहे. घरातील अनेक कामेही पूर्ण होतील.

हेही वाचा – जुलै महिना या ५ राशींसाठी ठरेल वरदान! मिळेल सुवर्णसंधी आणि राजवैभव

अंगारक संकष्टी तिथी
२५ जून रोजी म्हणजेच आज रात्री १:२३ वाजता चतुर्थी तिथी सुरू झाली असून आज रात्री ११:१० वाजता चतुर्थी तिथी समाप्त होईल. आज चंद्रोदय रात्री १०.२३ वाजता होईल.