Rashi Bhavishya 5 May 2026 In Marathi : उद्या ५ मे २०२६ रोजी वैशाख कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी बुधवारी सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत राहील. आज रात्री १२ वाजून १७ मिनिटांपर्यंत शिव योग जुळून येईल आणि दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत जेष्ठ नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ५४ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ५ वाजता सुरु होईल ते ६ वाजून ४८ पर्यंत असणार आहे. आज अंगारकी संकष्टी चतुर्थी असणार आहे. तर गणपती बाप्पाच्या कृपेने तुमचा दिवस कसा जाणार जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, ५ मे २०२६ (Dainik Rashi Bhavishya 5 May 2026 In Marathi)
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
घरात तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. केलेल्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. कौटुंबिक खर्च वाढीस लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
काम आणि वेळ यांचे योग्य नियोजन करावे. सर्व बाबींचा अंदाज बांधावा लागेल. नवीन विचार अंमलात आणाल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. बदलांकडे वेगळ्या नजरेने पहावे.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
लपवाछपवी करू नका. फसवणुकीपासून सावध राहावे. मनातील नैराश्य काढून टाकावे. क्षणिक गोष्टींचा आनंद घ्याल. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
मोठ्या लोकांची घरी ऊठबस वाढेल. योग्य मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. कामात स्त्रियांची मदत मिळेल.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
चारचौघात तुमची कला सादर करता येईल. सरकारी कामे मार्गी लागतील. मध्यस्थीच्या कामातून चांगला लाभ मिळेल. जोडीदाराची बाजू विचारात घ्यावी. क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका.
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
मानसिक व्यग्रता जाणवेल. सहकार्यांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे. नातेवाईकांना मदत करावी लागेल. वादातून मानसिक ताण वाढू शकतो.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
योग्य संधीची वाट पहावी. काही कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. स्वभावात काहीसा चीड-चीडेपणा येईल. जोडीदाराविषयी गैरसमज करू नयेत.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
भागीदारीतून चांगला लाभ होईल. शक्यतो प्रवास टाळावा. पत्नीचे वर्चस्व राहील. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. आपल्याच मताचा आग्रह धरू नका.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे. आरोग्यात सुधारणा होईल. नातेवाईकांची योग्य वेळी मदत घेता येईल. भावंडांशी मतभेद संभवतात.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
जोडीदाराचे वागणे दुराग्रही वाटू शकते. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. नवीन लोकांच्या ओळखी होतील. घरगुती प्रश्नांबाबत आग्रही भूमिका घ्याल. संयम सोडून चालणार नाही.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
स्वत:चेच म्हणणे खरे कराल. इतरांचे मत देखील विचारात घ्यावे. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. क्षुल्लक गोष्टींचा त्रागा करू नका. आपली छाप पडण्यात यशस्वी व्हाल.
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
हातात नवीन अधिकार येतील. तुमच्या कलेला प्रोत्साहन दिले जाईल. कोणाशीही उघड उघड शत्रुत्व पत्करू नका. आपले त्रासाला स्वत:च कारणीभूत होऊ नका. कामातील बदलांकडे लक्ष ठेवावे.
