April 1 To 30 Monthly Horoscope : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह आपल्या भ्रमण कक्षेत साधारण ३० दिवसाच्या अंतराने काही अंशी हालचाल करत असतो. ठराविक कालावधीनांनंतर आपले स्थान बदलून राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. येत्या एप्रिल महिन्यात सुद्धा तसेच काहीसे चित्र बघायला मिळेल. प्रत्येक काहीराशींसाठी सुखाचे तर काहींना कष्टाचे दिवस अनुभवावे लागू शकतात. ग्रहांच्या प्रभावाबरोबरच काही महत्वाचे सण अक्षय तृतीया, हनुमान जयंती सुद्धा या महिन्यात असणार आहेत. त्यामुळे हा महिना आणखीन खास असणार आहे. तर तुमच्या राशीला हा महिना कसा जाणार याबद्दल आपण ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांच्याकडून जाणून घेणार आहोत…

मेष

साडेसाती चालू असल्याने २ एप्रिलच्या हनुमान जयंतीचे विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीया खूप लाभकारक ठरेल. आर्थिकदृष्ट्या बलवान व्हाल. स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर सर कराल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता करण्यात अडथळे आले तरी सातत्य सोडू नका. नोकरीच्या ठिकाणी आपले विचार स्पष्ट शब्दांत मांडले नाहीत, तर चुकीचा समज होण्याची शक्यता आहे. याबाबत विशेष खबरदारी घ्यावी. विवाहोत्सुक मंडळींचे विवाह ठरतील. गुरूचे पाठबळ चांगले आहे. कामासाठी परदेश दौरा कराल. स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटेल. कौटुंबिक प्रश्न शिताफीने सोडवाल. भावना आणि कर्तव्य यांचा उत्तम ताळमेळ ठेवाल. वैचारिक आव्हाने पेलताना आपली मानसिक स्थिती, ताण तणाव याचे उत्तम नियोजन कराल.

वृषभ

२ एप्रिलच्या हनुमान जयंतीच्या दिवशी विशेष लाभकारक घटना घडेल. तर अक्षय्यतृतीया संमिश्र अनुभव देईल. रवी आणि शुक्र यांचा सकारात्मक प्रभाव दिसेल. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयारी करताना उत्साही वाटेल. मेहनत फळास येईल. नोकरीच्या ठिकाणी प्रभावीपणे आपले मत मांडाल. सादरीकरण उत्तम कराल. विवाह जुळण्यास ग्रहमान साथ देतील. कौटुंबिक नाते संबंध जोपासाल. गुंतवणूकदारांना धोक्याचा इशारा मिळेल. सावधगिरी बाळगा. मोठी जोखीम पत्करू नका. जमिनीचे व्यवहार अर्ध्यावर थांबतील. मूत्रविकार सतावतील. वेळेवर वैद्यकीय मदत घ्यावी.

मिथुन

२ एप्रिलचा हनुमान जन्मोत्सव मनातील गोष्टी पूर्ण करण्यास मदत करेल. १९ एप्रिलची अक्षय्य तृतीया अक्षय्य समृद्धी देणारी ठरेल. रवी, शुक्राच्या जबरदस्त सहकार्याने स्वतःला सिद्ध करून दाखवाल. विद्यार्थी वर्गात आत्मविश्वास निर्माण होईल. अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केल्याने उच्च शिक्षणातील पुढचे पाऊल टाकाल. नोकरीमध्ये विविध आव्हाने शिताफीने पेलाल. आपले म्हणणे स्पष्टपणे मांडलेत तर पुढे गैरसमज होणार नाही. विवाहासाठीचे प्रयत्न सफल होतील. जोडीदारासह प्रेमबंध दृढ होतील. नातेवाईक आणि मित्र मंडळींना योग्य मार्गदर्शन कराल. आपल्या आकलन शक्तीचा उत्तम उपयोग करून घ्याल. गुंतवणूक करताना अतिरिक्त आत्मविश्वास कामाचा नाही. थोडा धीर धरा. चांगले गुरुबल योग्य मार्ग दाखवेल. हाडं आणि मांड्या, पोटऱ्या यांचे आरोग्य सांभाळा.

कर्क

२ एप्रिलचा हनुमान जन्मोत्सव विशेष आत्मविश्वास देणारा असेल. हातून मोठे कार्य घडेल. विद्यार्थिवर्ग शिक्षकांच्या सल्ल्याने आगेकूच करील. परीक्षा, सादरीकरण, तोंडी परीक्षा यांत अव्वल गुण संपादन कराल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित पगारवाढ नाही मिळाली तरी नव्या क्षेत्रात पदार्पण कराल. नव्या कामात मन रमेल. अक्षय्यतृतीयेला नव्या प्रकल्पाची घोषणा कराल. विवाहित मंडळींना एकमेकांकडून आपलेपणाची ऊब मिळेल. कौटुंबिक कलह सोडवण्याचा प्रयत्न कराल. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून लोकोपयोगी योजना राबवाल. गुंतवणूक करून माफक लाभ मिळाला तरी धन्यता मानाल. सुरक्षित गुंतवणुकीकडे आपला कल असेल. जागेच्या बाबतीत घाईघाईने निर्णय घेऊ नका. खरेदी-विक्री वा भाडेतत्त्वाचे व्यवहार करताना समोरच्या व्यक्तीची सत्यता पडताळून बघाल. हाडे आणि रक्तातील घटक यांच्या समस्या उद्भवतील.

सिंह

हनुमान जन्मोत्सव आर्थिकदृष्ट्या लाभकारक असेल तर अक्षय्य तृतीया कामकाजात प्रगती करणारी असेल. विद्यार्थी वर्गाचा कल अभ्यासाऐवजी क्रीडा आणि समाज माध्यमांकडे असेल. वेळच्या वेळी अभ्यासावर लक्ष केंद्रित झाले नाही तर वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. चांगल्या मित्रांच्या संगतीत राहावे. नोकरी व्यवसायात, व्यापारात आपल्या मतावर ठाम राहाल. नुकसान टळेल. गुंतवणूक करताना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नका. विवाह जुळतील, मनपसंत जोडीदार मिळेल. विवाहित मंडळींच्या मनातील योजना प्रत्यक्षात उतरतील, स्वप्ने साकार होतील. प्रचंड मेहनत घ्याल. प्रवास योग येईल. देश विदेशात कामानिमित्त वा फिरण्यासाठी प्रवास कराल. पोट बिघडण्याची शक्यता आहे.

कन्या

भाग्यकारक घटना घडण्याचा हा महिना आहे. महत्वाची कामे मार्गी लागतील. हनुमान जन्मोत्सवाचा दिवस विशेष लाभकारक ठरेल. विद्यार्थी वर्गाला मेहनतीचे उत्तम फळ मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जायची तयारी कराल. त्यासाठीच्या परीक्षेत यश मिळेल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने केलेला प्रवास नवी दिशा देणारा असेल. मनातील शंका कुशंका वेळीच दूर कराव्यात. वरिष्ठांच्या अनुभवाचा सल्ला आपणास उपयोगी ठरेल. विवाहित मंडळींनी जोडीदाराकडून अति अपेक्षा न ठेवता नात्यात लवचिकता ठेवावी. लहान मोठ्या शाब्दिक चकमकी थोडक्यातच संपवाव्यात. गुंतवणूकदारांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक केल्यास भरघोस धनप्राप्ती होईल. मोठी जोखीम मात्र नुकसान करेल. जमीन जुमल्याबाबत कोर्टाची पायरी चढावी लागेल. उष्णतेचे विकार सतावतील.

तूळ

अक्षय्य तृतीयेला बक्कळ धनलाभ होईल. कष्टाचे चीज होईल. नोकरीमध्ये बदल संभवतो. राहण्याचे ठिकाण बदलण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाने मेहनत घेऊन, अभ्यासावर लक्ष केंद्रित करून स्वतःला सिद्ध करून दाखवावे. परदेशासंबंधित कामे मार्गी लागतील. इतरांवर छाप पडेल असे भाषण कराल. मोठ्या सभेत प्रभावी व्यक्तिमत्व उठून दिसेल. वरिष्ठांची आपल्यावर विशेष मर्जी बसेल. विवाहोत्सुक मंडळींनी वधूवर संशोधन सुरू ठेवावे. विवाहितांची सुखस्वप्ने पूर्ण होतील. संतती प्राप्तीच्या प्रयत्ननांना यश मिळेल. गुंतवणूक करताना मोठी जोखीम पत्करणे हिताचे नाही. जमीन, मालमत्ता यांच्या प्रश्नांवर शांतपणे चर्चा होणे गरजेचे आहे. ऋतुबदलानुसार उष्णतेचे विकार सुरू होतील. तोंड येईल. जीभ फुटेल. अस्वस्थता वाढेल.

वृश्चिक

हनुमान जन्मोत्सव या राशीसाठी विशेष लाभदायक ठरेल. आर्थिकदृष्ट्या प्रगती होईल. विद्यार्थी वर्गाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. कठीण विषय आत्मसात करण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. नोकरीच्या निमित्ताने प्रवास योग येईल. नवे अनुभव गाठीशी येतील. वरिष्ठांच्या सल्ल्याने आगेकूच कराल. विवाहित दाम्पत्यांना उत्तम विवाहसुख मिळेल. कुटुंबातील सदस्यांसाठी खरेदी कराल. वाहनसुख मिळेल. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि त्यांचा अनुभव कामी येईल. पोकळ भूलथापांना भुलू नका. शाश्वत गुंतवणूक लाभ देईल. न्यायालयीन कामात वेळ, ऊर्जा व पैसे अधिक प्रमाणात खर्च होतील. डोळे उघडे ठेवून व्यवहार करावेत. त्वचेसंबंधित समस्या उदभवतील.

धनु

हनुमान जन्मोत्सव आर्थिकदृष्ट्या आणि करियरच्या दृष्टीने खूपच महत्वाचा असेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्याने उत्तम परिणाम दिसून येईल. उच्च शिक्षणाचा प्रभाव दिसेल. नोकरी व्यवसायात आपल्या शब्दांना वजन येईल. डोक्यात राग घालून घेण्यापेक्षा समजूतदारीने आपला मुद्दा मांडाल. विवाहोत्सुक मंडळींना मनपसंत जोडीदार मिळेल. भेटीगाठीत एकमेकांचे स्वभाव समजतील. विवाहित दाम्पत्यांची सुख स्वप्ने आकार घेतील. संतती प्राप्तीचे योग आहेत. वैद्यकीय सल्ला, मार्गदर्शन, उपचार यांचा लाभ होईल. घराच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा. घाई करू नका. कामानिमित्त किंवा भटकंतीसाठी प्रवास कराल. अक्षय्य तृतीयेला गुंतवणूकदारांच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळाले नाही तरी हताश होऊ नका. गुंतवणूकीतील अभ्यासपूर्वक प्रयत्न यश देतील.

मकर

हनुमान जन्मोत्सव विशेष भाग्यकारक ठरेल. आनंद वार्ता मिळेल. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी मार्ग मोकळा होईल. आर्थिक स्थिती सावराल. नोकरी-व्यवसायात मोठ्या प्रकल्पात सहभागी व्हाल. वरिष्ठांपुढे आपली मते स्पष्टपणे मांडाल. आपल्या प्रभावी भाषणाचा समुदायावर विशेष पगडा दिसून येईल. कौतुकाची थाप मिळेल. अक्षय्य तृतीयेला विवाहितांच्या महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब होईल. एकमेकांच्या सानिध्यात उत्साह वाढेल. कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळवाल. गुंतवणूकदारांना अपेक्षित लाभ मिळेल. काळजीपूर्वक आणि अभ्यासपूर्वक केलेल्या गुंतवणुकीतून बक्कळ धनराशी जमा होईल. परदेशी प्रवासाची आखणी कराल. १४ तारखेनंतर घराचा, जमिनीचा व्यवहार पूर्ण होईल. लाभ होईल. कौटुंबिक हेवेदावे बाजूला ठेवून मोकळ्या मनाने नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. मान, खांदा यांतील शिरा आखडतील.

कुंभ

संपूर्ण महिना खूप घाई गडबडीचा असेल. नवनव्या घटना घडतील. विद्यार्थी वर्गाच्या हुषारीची खरी कसोटी असेल. अभ्यासाचे उत्तम फळ मिळेल. आपल्या बुद्धिमत्तेची उत्तम छाप पाडाल. नोकरी व्यवसायात भाषण, सादरीकरण आणि प्रात्यक्षिके यात बाजी माराल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. विवाहोत्सुक मंडळींनी वधुवर संशोधन सुरू ठेवावे. विवाह योग चालू आहे. विवाहित जोडप्यांसाठी परीक्षेची वेळ आहे. एकमेकांना समजून घेणे आणि आधार देणे फार गरजेचे आहे. गुंतवणूक करताना दीर्घकालीन गुंतवणूक पसंत कराल. याचा शाश्वत परतावा मिळेल. घराच्या, जमिनीच्या संदर्भातील कामे मार्गी लागतील. आशेचे किरण दिसतील. प्रवास लाभदायक आणि फायदेशीर ठरतील. एकंदरीत कामांचा वेग वाढेल. मान, मणका आणि खांदे यावरचा भार वाढेल. दुखणे अंगावर काढू नका.

मिन

हनुमान जन्मोत्सव उत्साह वाढवेल. प्रेरणादायक घटना घडतील. विद्यार्थी वर्ग अभ्यासात रमेल. विषय आत्मसात करणे सोपे जाईल. उच्च शिक्षणासाठी भरपूर मेहनत घ्याल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांच्या संमतीने नव्या योजना राबवाल. सहकारी वर्गाच्या हिताचा निर्णय घ्याल. विवाहितांचे कौटुंबिक प्रश्न सुटतील. साडेसातीच्या प्रभावामुळे विरोध पत्करावा लागेल. गुंतवणूक करताना मोठी जोखीम पत्करणे धोक्याचे ठरेल. जुने येणे वसूल कराल. मित्रांच्या मदतीने काही गोष्टी सुलभ होतील. घर, बंगला बांधणे ही स्वप्ने साकार होतील. जमिनीच्या कामानिमित्त सरकार दरबारी खेपा घालाव्या लागतील. अक्षय्य तृतीया अक्षय्य आनंद घेऊन येईल. अडीअडचणींचा सामना करताना आत्मविश्वास बळावेल. पित्ताचा त्रास होईल.

तर असा १२ राशींचा एप्रिल महिना असणार आहे