April 2026 Festival And Holidays List : मार्च महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. मग एप्रिल महिना सुरु होणार आहे. हिंदू पंचांगानुसार, हा महिना चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला सुरू होऊन वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला संपणार आहे. वैशाख हा मराठी नववर्षाचा दुसरा महिना आहे. या महिन्यात अक्षय तृतीया, हनुमान जयंती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे, महात्मा ज्योतिबा फुले जयंती, संकष्टी चतुर्थी, मोहिनी एकादशी, चैत्र पौर्णिमा, वरुथिनी एकादशी आणि मोहिनी एकादशी अशा महत्वपूर्ण दिवसांचा समावेश असणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनांनंतर आपले स्थान बदलून राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. यानुसार १२ राशींवर त्याचा शुभ- अशुभ प्रभाव पडत असतो. साधारणतः प्रत्येक महिन्यात काही अंशी ग्रहांचे स्थान बदलते. येत्या एप्रिल महिन्यात सुद्धा तसेच काहीसे चित्र बघायला मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर हा महिना अत्यंत खास आहे. कारण – या महिन्यात चंद्र १९ वेळा आपले नक्षत्र बदलणार आहे.अनेक महत्त्वाचे ग्रह बदल होतील ज्यामुळे शुक्रादित्य राजयोग आणि बुधादित्य राजयोग असे शुभ योग तयार होतील.
एप्रिल महिन्यातील सण-उत्सवांची यादी (April 2026 Festival List In Marathi )
- १ एप्रिल – चैत्र पौर्णिमा
- २ एप्रिल – हनुमान जयंती
- ५ एप्रिल – संकष्टी संकष्टी
- ९ एप्रिल – मासिक कृष्ण जन्माष्टमी
- १० एप्रिल – कालाष्टमी
- १३ एप्रिल – वरुथिनी एकादशी
- १४ एप्रिल – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती,
- १५ एप्रिल – मासिक शिवरात्री
- १७ एप्रिल – दर्श अमावस्या,
- १८ एप्रिल – चंद्र दर्शन, वैशाख मासारंभ
- १९ एप्रिल – अक्षय्य तृतीया, त्रेतायुग दिवस, मातंगी जयंती
- २० एप्रिल – विनायक चतुर्थी
- २७ एप्रिल – मोहिनी एकादशी
- ३० एप्रिल – नृसिंह जयंती
