scorecardresearch

‘या’ राशी एप्रिल महिन्यात ठरतील लकी? गुरु- सूर्य- शुक्र गोचराने प्रचंड धनलाभ होऊन अनुभवू शकता अच्छे दिन

April 2023 Lucky Zodiac Signs: या शुभ कालावधीत अनेक राशींच्या भाग्यात काही मोठ्या उलाढाली दिसून येऊ शकतात. काही राशींचे नशीब अगदी सूर्याप्रमाणे चमकू शकते

April Graha Gochar 2023 Guru Shukra Budh Surya Gochar To Give More Money To Lucky Zodiac signs Get Your Achhe Din Astrology
'या' राशी एप्रिल महिन्यात ठरतील लकी (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

April Month Lucky Zodiac Signs: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह प्रत्येक महिन्यात राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. शनी- मंगळ, राहू- केतू यांसारखे ग्रह सुद्धा काही अंशी भ्रमण कक्षा बदलत असतात. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार ग्रहांच्या स्थितीनुसार एप्रिल महिना हा अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो. एप्रिल महिन्याच्या ३० दिवसांमध्ये सूर्य, गुरु, शुक्र ग्रह गोचर करून राशी बदल करणार आहेत. या गोचरांसह काही अत्यंत शुभ व लाभदायक महायोग व राजयोग तयार होणार आहेत. या शुभ कालावधीत अनेक राशींच्या भाग्यात काही मोठ्या उलाढाली दिसून येऊ शकतात. काही राशींचे नशीब अगदी सूर्याप्रमाणे चमकू शकते. या भाग्यवान राशी कोणत्या व एप्रिल महिन्यात कोणत्या ग्रहांचे गोचर होणार आहे हे जाणून घेऊया…

एप्रिल २०२३ मध्ये कोणते ग्रह करणार राशी बदल?

सूर्य गोचर २०२३ (Sun Transit 2023)

१४ एप्रिल २०२३ ला दुपार ३ वाजून १२ मिनिटांनी सूर्यदेव मीन राशीतून निघून मेष राशीत प्रवेश करणार आहेत. १५ मे पर्यंत सूर्य देव मेष राशीत स्थिर असणार आहेत.

गुरु गोचर २०२३ (Jupiter Transit 2023)

ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, गुरु ग्रह शनिवारी २२ एप्रिल २०२३ ला सकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करणार आहे. १ मे पर्यंत गुरु ग्रह मेष राशीत असणार आहे.

शुक्र गोचर २०२३ (Shukra Gochar 2023)

शुक्र देव मेष राशीतून निघून वृषभ राशीत प्रवेश घेणार आहेत. ६ एप्रिल २०२३ ला सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी हा राशीबदल होणार असून २ मे पर्यंत शुक्र वृषभ राशीत असणार आहे.

एप्रिल महिन्यात ‘या’ ग्रहांची युती

एप्रिल महिन्यात मेष राशीमध्ये गुरु, राहू, सूर्य, बुध यांची युती होणार आहे. या युतीतून गुरूचा राजयोग व चतुर्ग्रह योग्य निर्माण होणार आहे.

एप्रिल महिन्यातील भाग्यवान राशी (April Month Lucky Zodiac Signs)

वृषभ रास (Taurus Zodiac)

व्यय स्थानातील उच्चीचा रवी राहूसह असल्याने गरज नसताना धाडसी निर्णय घेऊ पाहाल. मोठी जोखीम पत्करू नका. महिन्याच्या मध्यापर्यंत गुरुबल आहे. तोवर स्वतःला सावरणे शक्य होईल. कौटुंबिक वातावरण संमिश्र असेल. आपली मते घरात सर्वांना पटतीलच, असे गृहीत धरू नका. विद्यार्थी वर्गाने सामंजस्य दाखवावे. चिडचिड टाळा. ऊर्जेचा अपव्यय करू नका. उष्णतेचे विकार डोकं आणि पोटावर परिणाम करतील. शांत डोक्याने सर्व समावेशक विचार लाभकारी ठरेल.

मिथुन रास (Gemini Zodiac)

शनी मंगळाच्या शुभ योगामुळे धाडसी निर्णय घेऊ शकाल. या निर्णयाच्या परिणामांची आपणास पूर्वकल्पना असेलच. लाभ स्थानातील मेष राशीत २१ एप्रिलला गुरू प्रवेश करेल. गुरूसह राहू, हर्षल आणि रवीचे भ्रमण काही काळ अनिश्चितता दाखवेल. वैचारिक गोंधळ होण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात कोणतेही मत मांडताना सावधगिरी बाळगावी. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची कसून तयारी करावी. विवाहोत्सुक मंडळींनी २१ एप्रिलनंतर जोडीदाराचे संशोधन सुरू करावे. अपेक्षेप्रमाणे आणि आचार विचारांमध्ये समानता असणारा जोडीदार मिळेल.

हे ही वाचा<< रेवती नक्षत्रात बुध- गुरु एकत्र आल्याने ‘या’ राशींना प्रचंड धनलाभाची संधी; नोकरीत बदलांचे संकेत व श्रीमंतीचा योग

कर्क रास (Cancer Zodiac)

लाभ स्थानातील स्वगृहीचा शुक्र आर्थिक लाभ करून देईल. दशमातील उच्चीचा रवी अधिकारपद भूषवेल. त्याच्यासह राहू हर्षल असल्याने स्पर्धेला सामोरे जावे लागेल. विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल. जोडीदाराची मनस्थिती समजून घ्यावी. २१ एप्रिलला गुरू आपल्या दशमातील मेष राशीत प्रवेश करेल. महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाल. मुलांच्या समस्या सोडवताना भावनिक दृष्टिकोन बाजूला ठेवून विवेकी विचार करावा. हे मुलांच्याही फायद्याचे ठरेल. डोकेदुखीचा त्रास संभवतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 16:34 IST

संबंधित बातम्या