Budh Gochar: एप्रिल महिन्यात बुध ग्रहाचे मोठे गोचर होणार आहे. सर्वात आधी बुध नीच राशी मीन राशीत जाणार आहेत. त्यामुळे नीचभंग योग तयार होईल. पण बुधचे गोचर इथेच थांबणार नाही. त्यानंतर बुध मेष राशीत प्रवेश करतील. ११ एप्रिलला बुध मीन राशीत, तर ३० एप्रिलला मेष राशीत जातील. त्यामुळे एका महिन्यात बुध तुम्हाला दोनदा बदल जाणवून देतील. याचा तुमच्या राशीवर खास प्रभाव पडेल.
बुध हे पैशांचे नियोजन, व्यवसाय, ज्ञान, बँकिंग व्यवस्था आणि लेखनशक्तीचे कारक मानले जातात, त्यामुळे याचा तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम होईल. येथे आपण त्या ६ राशींविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांच्यावर बुधच्या गोचराचा विशेष प्रभाव दिसेल. या गोचराचा वृश्चिक, धनु, मकर आणि कुंभ राशींसाठी शुभ परिणाम राहील.
तूळ राशी (Libra Horoscope)
तूळ राशीचे लोक शत्रूंवर विजय मिळवतील. अतिशय जवळच्या व्यक्तीसोबत तणाव वाढू शकतो. आतल्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. लिव्हर, किडनी किंवा प्रोस्टेटच्या त्रासामुळे चिंता वाढेल. प्रवासाचा खर्च वाढेल. भोग-विलास आणि सुखसोयींवर जास्त खर्च होईल. नशिबात काही अडथळे येऊ शकतात. धार्मिक कामांवर खर्च वाढेल.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
या राशीच्या लोकांची आर्थिक प्रगती होईल. व्यवसायाचा विस्तार वाढेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तयार होतील. मुलांवर खर्च आणि थोडीशी चिंता वाढेल. वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळेल. मेहनतीचे फळ सकारात्मक मिळेल. जागा बदलण्याचा योग आहे. डाव्या कानात दुखू शकते.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
धनु राशींसाठी घर आणि वाहनसुखात वाढ होईल. जमीन-जुमला आणि स्थावर मालमत्तेचा फायदा मिळेल. भागीदारीच्या कामांमध्ये प्रगती होईल. मेहनतीत काही अडथळे येऊ शकतात. वैवाहिक आयुष्यात सामान्य तणाव राहील. खर्च वाढेल. सामाजिक मान-सन्मानाबद्दल थोडी चिंता वाढेल.
मकर राशी (Capricorn Horoscope)
राशींसाठी पराक्रम, मेहनत आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कामांमध्ये नशिबाची साथ मिळेल. वडिलांचे सहकार्य आणि सान्निध्य वाढेल. धार्मिक कामांवर खर्च वाढेल. धार्मिक प्रगती होईल. राजकीय लाभ मिळू शकतो. व्यवसायात समृद्धी येईल. शत्रूंमुळे तणावही वाढू शकतो.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
कुंभ राशींसाठी पैशांशी संबंधित कामात प्रगती होईल. कौटुंबिक कामांवर खर्च वाढेल आणि घरातील जबाबदाऱ्या वाढतील. पोट आणि पायाच्या त्रासामुळे चिंता वाढेल. आतल्या आजारांमध्ये वाढ होऊ शकते. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. बोलण्यात कडकपणा वाढू शकतो.
मीन राशी (Pisces Horoscope)
मीन राशींसाठी मानसिक विचार आणि चिंता वाढतील. चिडचिड वाढू शकते. घर आणि वाहनसुख वाढेल. स्थावर मालमत्तेचा फायदा मिळेल. भागीदारीच्या कामांमुळे तणाव वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. जोडीदारासोबत मनमुटाव होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
