Aquarius Friendship Compatibility : जीवनातल्या सुख-दुःखाला तर कधी यश-अपयशाला मैत्रीची गरज भासते. त्यामुळे आयुष्यात योग्य मित्र-मैत्रीण निवडणे खूप गरजेचे असते. तर मित्र राशी आणि शत्रू राशीचे वर्णन ज्योतिषशास्त्रात आढळते. तर आज आपण पाहूया की, कुंभ राशीच्या लोकांचं कोणत्या राशींच्या व्यक्तीबरोबर चांगले जमते आणि कोणत्या राशींसोबत त्यांचे वैर असते.

कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. कुशाग्र बुद्धी, संशोधक वृत्ती, ज्ञानलालसा हे शनीचे गुण कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा आणि तुमची स्मरणशक्ती देखील उल्लेखनीय असते. अत्यंत बुद्धिमान, संवेदनशील, आकर्षक आणि दृढनिश्चयी असतात. त्यामुळे या राशीच्या मंडळींना इतरांचे अनुकरण करायला आवडत नाही. नेहमी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून जगत असतात. शांतपणे कामावर लक्ष केंद्रित करतात, स्वतःच्या कामात कोणाचाही हस्तक्षेप सहन करू शकत नाहीत. यामुळेच कुंभ राशीच्या मंडळी अत्यंत मेहनती असतात.

कुंभ राशीच्या मित्र राशी कोणत्या?

मिथुन, तूळ आणि धनु राशीच्या लोकांबरोबर तुमची सगळ्यात चांगली मैत्री होते. असे म्हटले जाते की, या राशींच्या लोकांबरोबर त्यांचे चांगले जमते. मेष, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांशी यांचे संबंध चांगले आणि गोड राहतात. या राशींमध्ये एकमेकांशी समजूतदारपणा, जुळवून घेण्याची क्षमता आणि मैत्रीपूर्ण वागणूक दिसून येते.

कुंभ राशीच्या शत्रू राशी कोणत्या ?

कुंभ राशीचे लोक पटकन मित्र बनवतात. तरी त्यांचे वृषभ आणि वृश्चिक यांसारख्या काही राशींच्या लोकांबरोबर नीट जमत नाही. या दोन राशींबरोबर त्यांचे अनेकदा मतभेद होतात.

कुंभ राशीचे लोक चांगले मित्र ठरतात?

कुंभ राशीचे लोक अत्यंत निष्ठावान, मनमोकळे आणि विश्वासू असतात. संकटाच्या वेळी ते आपल्या मित्रांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतात, मित्रांना मार्गदर्शन देतात. काय बरोबर आणि काय चूक आहे याबद्दल वारंवार सल्ला देतात. मित्र देखील आवडीने त्यांचा सल्ला घेतात. त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता चांगली असते.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)