Aquarius Personality Traits : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशी कुठल्या ना कुठल्या ग्रहाशी संबंधित असते. प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे वेगळे स्वरुप आणि स्वभाव असतात. जर दोन ग्रहांचे स्वरुप एकमेकांशी समान असेल किंवा अनुकूल स्थितीत असेल तर त्यांना अनुकूल ग्रह म्हणतात. त्याचप्रमाणे, जेव्हा ते दोघे भिन्न स्वभावाचे असतात, तेव्हा त्यांना शत्रू ग्रह म्हणतात. त्यामुळे या प्रत्येक ग्रहाचा संबंध प्रत्येक राशींशी असतो. ज्या राशीवर ज्या ग्रहाची सत्ता चालते, त्या ग्रहाचे गुणधर्म त्या त्या राशीच्या व्यक्तींमध्ये उतरतात.
तर आज आपण कुंभ राशीबद्दल जाणून घेणार आहोत. कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. त्यामुळे शनिदेवाची ही आवडती रास आहे. कुशाग्र बुद्धी, संशोधक वृत्ती, ज्ञानलालसा, सहनशीलता, चिकाटी, दीर्घोद्योग, काटकसर आणि गंभीर प्रवृत्ती हे शनीचे गुण कुंभ राशीच्या मंडळींमध्ये दिसून येतात. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा तुमच्यात असतो. तुमची स्मरणशक्ती देखील उल्लेखनीय असते. पण, शांत आणि बुद्धिजीवी कुंभ रास १२ राशींमध्ये सगळ्यात वेगळी का ठरते याबद्दल ५ मुद्यांमध्ये जाणून घेऊयात…
१. तुम्ही खूप मोकळ्या मनाचे असतात. म्हणूनच इतरांना तुमची साथ खूप आवडते. साध्या स्वभावाने तुम्ही कोणाचेही मन जिंकून घेता.
२. बुद्धिमान तर असतात आणि त्यातच मन लावून खूप तीक्ष्णपणे तुम्ही काम करता, ज्यामुळे कोणत्याही समस्येवर लगेच उपाय शोधू शकतात.
३. तुमचे मन खूप मोठे असते. इतरांचे दुःख समजून घेऊन तुम्ही मदतीसाठी तत्पर असतात. यामुळेच अनेक मंडळी तुमच्याशी पटकन जोडली जातात.
४. तुम्ही अत्यंत निष्ठावान आणि प्रामाणिक असतात. कधीही, कोणाचाही विश्वासघात करत नाहीत. एकदा मैत्री झाली की, ती मृत्यूपर्यंत टिकते. म्हणूनच तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येतो.
५. शांत आणि संयमी असतात म्हणूनच आयुष्यात कितीही संकटे आली तरीही तुम्हाला मोठे यश मिळवून देण्यात मदत होते.
