March 2026 Aries Horoscope : दिनदर्शिकेनुसार मार्च हा वर्षाचा तिसरा महिना आहे. काही दिवसातच मार्च महिन्याला सुरुवात होईल. या महिन्यात होळी, चैत्र नवरात्री, गुढीपाडवा असे अनेक सण उत्साहाने साजरा करण्याची संधी मिळते. त्यामुळे हिंदू कॅलेंडरनुसार, हा महिना खूप खास मानला जातो. कारण – मार्च महिन्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते.हा महिना फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीपासून सुरु होऊन चैत्र महिन्याच्या त्रयोदशी तिथीला संपतो आहे. तर मार्च महिना मेष राशीसाठी कसा जाणार हे आपण ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांच्याकडून जाणून घेऊया..
तर येत्या मार्च महिन्यात २ तारखेला येणारी होळी आळस झटकून नवी प्रेरणा देईल. रंगपंचमी नवे विचार घेऊन येईल. गुढीपाडव्याला नव्या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवाल आणि रामनवमीच्या सुमारास यशाच्या दिशेने वाटचाल करता येईल. विद्यार्थ्यांना नावीन्याची ओढ वाटेल. परीक्षेच्या दृष्टीने केलेली मेहनत फळास येईल. नोकरी किंवा व्यवसायात मांडलेले आराखडे योग्य ठरतील.
या महिन्यात उत्तम निर्णय घ्याल. सर्वांच्या हिताचा विचार कराल. जोडीदाराची निवड सुयोग्य ठरेल. फक्त घराच्या व्यवहारात चौकशी केल्याशिवाय घाईने निर्णय घेऊ नका. प्रवास लाभकारक आणि सुखकर होईल. विचारांना सकारात्मक दिशा मिळेल. गुरुबल चांगले आहे. साडेसातीची तीव्रता जाणवणार नाही. ऋतुबदलानुसार त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागेल. असा मेष राशीचा मार्च महिना असणार आहे…
मार्च महिन्यात ग्रहांची स्थिती कशी असणार?
२ मार्च रोजी शुक्र मीन राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे मालव्य राजयोग तयार होईल. याशिवाय, इथे तो शनिशी देखील युती करणार आहे. त्यानंतर, ३ मार्च रोजी यम श्रवण नक्षत्रात आणि मंगळ शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यानंतर, ४ मार्च रोजी शुक्र उत्तरभाद्रपद तर ५ मार्च रोजी सूर्य पूर्वभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. १० मार्च रोजी बुध शतभिषा नक्षत्रात आणि १५ मार्च रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे; ज्यामुळे त्रिग्रहीसह शुक्रादित्य राजयोग तयार होईल.
