Aajche Rashi Bhavishya 14 March 2026 In Marathi : आज १४ मार्च २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी रात्री ११ वाजून २९ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर वरियन योग जुळून येईल आणि उत्तराषाढा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून ९ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. तर शनिवार तुमच्या राशीसाठी कसा जाणार जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, १४ मार्च २०२६ (Dainik Rashi Bhavishya 14 March 2026 In Marathi)

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)

मानसिक व्यग्रता जाणवेल. ध्यानधारणेचा मार्ग धरावा. भावनेच्या भरात कोणतेही काम करू नका. काही वेळेस शांत राहणेच फायद्याचे ठरेल हे लक्षात ठेवा. आवडीचे पदार्थ चाखाल.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)

घरगुती कामाचा व्याप वाढेल. व्यावसायिक गणिते नीट अभ्यासावीत. अधिकार्‍यांची गाठ पडेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेता येईल. पत्नीची उत्तम साथ मिळेल.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

कामे मनाजोगी पार पडतील. मनातील सुप्त इच्छा पूर्ण करता येतील. गोड बोलण्यातून कामे साधता येतील. अधिकारी व्यक्तींचा मोलाचा सल्ला मिळेल. दिवस चांगल्या लोकांच्यात घालवाल.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)

आपली पत सांभाळण्याचा प्रयत्न करावा. कामात चंचलता आड आणू नये. वरिष्ठांचा शब्द मानावा लागेल. मनातील अनामिक भीती बाजूला. आत्मविश्वास कमी पडू देवू नका.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)

सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील असे नाही. मानसिक चांचल्य दूर सारावे. योग्य संधीची वाट पहावी. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. पत्नीशी मतभेद संभवतात.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)

सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील असे नाही. मानसिक चांचल्य दूर सारावे. योग्य संधीची वाट पहावी. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. पत्नीशी मतभेद संभवतात.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)

प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. घरगुती प्रश्न चर्चेने सोडवावे. वाहन विषयक कामे निघतील. आरोग्यात सुधारणा होईल.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)

कामाचा विस्तार वाढवावा. जवळच्या प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल. दिवस खेळीमेळीत जाईल.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)

प्रवासात सावध राहावे. नातेवाईकांचा विरोध होऊ शकतो. कौटुंबिक कलह टाळावा. गरज नसतांना पैसे खर्च करू नका. स्वत:मध्ये काही बदल करून पहावेत.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)

पोटाचे विकार संभवतात. खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे. हातात नवीन अधिकार येतील. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. उगाचच चिडचिड करू नये.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)

जास्त खोलात जाऊन चौकशी कराल. आपले मत योग्य ठिकाणीच मांडावे. काही गोष्टीत धूर्तपणे वागावे लागेल. योग्य तर्काचा आधार घ्यावा. वाणीत गोडवा ठेवावा.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)

चंचलतेवर मात करावी. मुलांचा हट्ट पुरवाल. वेळेचे योग्य नियोजन करावे. थोडा त्रास झाला तरी कमाई वाढेल. भावनेला आवर घालावी लागेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर