Horoscope Today in Marathi : १७ एप्रिल २०२५ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी सकाळी ३ वाजून २४ मिनिटांपर्यंत राहील. ज्येष्ठा नक्षत्र शुक्रवारी सकाळी ८ वाजून २१ मिनिटांपर्यंत जागृत असेल. आज वरीयान योग १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत जुळून येईल. आज राहू काळ १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असणार आहे. तर आज गुरुवार १२ राशींसाठी कसा जाणार हे आपण जाणून घेऊया…
१७ एप्रिल पंचांग व राशिभविष्य (Daily Rashi Bhavishya)
मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)
सांपत्तिक दर्जा सुधारेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. मनातील जुन्या इच्छा पूर्ण कराल. समाज कार्यात हिरीरीने भाग घ्याल. उत्तम गुंतवणुकीचा मार्ग निवडाल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)
प्रत्येक गोष्टीत आनंदाने रस घ्याल. कपडे-लत्ते खरेदी कराल. महिला नटण्या मुरडण्याची हौस भागवतील. चार चौघांत मिळून मिसळून वागाल. वैवाहिक सौख्यात न्हाऊन निघाल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)
मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टींची गुप्तता पाळाल. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मनात नसताना सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतील.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)
मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. जिथे जाल तिथे आनंद निर्माण कराल. कामातील गतीमानता वाढेल. वरिष्ठांची शाबासकी मिळवाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)
तुमचे कला गुण इतरांच्या समोर येतील. सर्वांच्या कौतुकाच्या विषय बनाल. व्यापारात चांगला फायदा होईल. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. बाहेरील अन्न पदार्थ टाळावेत.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)
आवडते साहित्य वाचाल. विशाल दृष्टिकोन ठेवाल. आध्यात्मिक गोष्टीं कडे कल वाढेल. कामात प्रगतीला वाव आहे. नवीन अनुभव गाठीशी बांधता येतील.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)
कमी श्रमातून धनलाभ संभवतो. जोडीदाराची बौद्धिक बाजू दिसून येईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. काही कामे वेळे आधीच पूर्ण होतील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)
स्व कर्तृत्वावर कामे मिळवाल. काही गोष्टींचे चिंतन करावे. भावंडांचे प्रश्न मार्गी लावाल. मनातील नैराश्य बाजूला सारावे. प्रवासात खबरदारी घ्यावी.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)
कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. खाण्या पिण्याचे पथ्य पाळावे. स्थावरची कामे पार पडतील. शक्यतो मोजक्या शब्दांत मत मांडा. डोळ्यांची काळजी घ्यावी.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)
प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. करमणुकीच्या कार्यक्रमांचा आनंद घ्याल. रेस जुगारातून धनलाभ संभवतो. संभाषणाची आवड पूर्ण कराल. तुमचे मत योग्य ठरेल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)
कला गुण जोपासण्याचा प्रयत्न करावा. मनात उगाचच चिंता सतावेल. जामीनकीचे व्यवहार सावधगिरीने करावेत. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. घरगुती वातावरणात रमून जाल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)
एकांगी विचार करू नका. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. गुंतवणुकीचे नवीन मार्ग शोधाल. कर्तव्याची जाणीव योग्य प्रकाराने बजावाल. मित्रांच्या सहवासाचा लाभ होईल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर