July 15–31 Horoscope 2026 : जुलै महिना संपायला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून महिन्याचे शेवटचे १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. त्यातच १५ जुलै पासून आषाढ महिना सुद्धा सुरु होत आहे. २७ जुलै रोजी, शनी मीन राशीत वक्री तर बुध मिथुन राशीत मार्गी होईल. या दोन प्रमुख ग्रहस्थितींचा परिणाम सर्व १२ राशींवर होईल. काहींना करिअर, आर्थिक. व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसू शकतात, तर काहींना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. १२ राशींसाठी जुलै महिन्याचे १५ दिवस कसे असणार आहेत चला जाणून घेऊयात…

मेष

येणारे १५ दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतात. तुमच्या करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता, सोबतच आर्थिक लाभही होईल. याव्यतिरिक्त, तुम्हाला अपेक्षित नफा मिळू शकतो, ज्यामुळे रखडलेले प्रकल्प पूर्ण करता येतील.

वृषभ

तुम्हाला आर्थिक बाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कला क्षेत्रात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. घाईचे व्यवहार टाळा, कुटुंबात गवताना, बोलताना संयम बाळगा.

मिथुन

बुध मार्गी होत असल्याने, तुमच्यासाठी काळ अनुकूल ठरू शकतो. अतिविश्वास ठेवू नका. कौटुंबिक पाठिंबा तर प्रवासाच्या आणि नवीन करिअरच्या संधी उपलब्ध होतील.

कर्क

तुमच्यासाठी हे १५ दिवस विशेष असू शकतात. काही बाबतीत कुटुंबातील सर्व सदस्यांकडून पाठिंबा मिळेल. मालमत्ता, वाहने किंवा मोठ्या गुंतवणुकीशी संबंधित तुम्ही निर्णय घेऊ शकता. आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सिंह

येणारे १५ दिवस तुमच्या आयुष्यात आनंद व नवीन यश घेऊन येऊ शकतात. कुटुंबातील सदस्याकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुम्हाला मेहनतीचे पूर्ण फळही मिळेल आणि कामाच्या ठिकाणी आदर वाढेल.

कन्या

करिअरमध्ये प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात. घरी काही धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो आणि तुमची एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

तुळ

येणारे १५ दिवस तुमच्यासाठी सामान्य असू शकतात. लग्नाचा चांगला प्रस्ताव येईल, घाईचे निर्णय घेणे टाळा. विचारपूर्वक केलेल्या कृती भविष्यात लाभ मिळवून देऊ शकतात.

वृश्चिक

शनीची वक्री गती तुम्हाला सावध राहण्यास प्रवृत्त करत आहे. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला ऊर्जेची कमतरता जाणवू शकते. याव्यतिरिक्त, कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा आणि संघर्ष टाळा. तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्या.

धनु

तुमच्या राशीला फायदा होईल. हुशारीने गुंतवणूक करा, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदा होऊ शकतो. अडकलेला निधी परत मिळेल. तुमच्या करिअरमध्येही सकारात्मक बदल दिसू शकतात.

मकर

तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक व करिअर या दोन्ही क्षेत्रांमध्ये आनंद मिळू शकतो. काही चांगली बातमी तुम्हाला उत्साहित करतील आणि तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारण्याची शक्यता आहे.

कुंभ

तुमच्यासाठी हा एक विशेष काळ असेल. गरज पडल्यास तुम्हाला पैसे उधार घ्यावे लागतील. या १५ दिवसांमध्ये खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेट सांभाळा. कामाच्या ठिकाणी कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे टाळा. तुमच्या आरोग्याबाबतही निष्काळजी राहू नका.

मीन

शनी तुमच्या राशीत वक्री होणार आहे. त्यामुळे येणारे दिवस सावधगिरी बाळगण्याचे संकेत देतात. तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. गोष्टी हळूहळू तुमच्या बाजूने वळतील.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)