Horoscope Today 16 July 2026 In Marathi : आज १६ जुलै २०२६ रोजी कृष्ण पक्षातील आषाढ महिन्यातील द्वितीया तिथी असणार आहे. आज आश्लेषा नक्षत्र जागृत असेल आणि त्याचबरोबर सिद्धी योग जुळून येत आहेत. राहू काळ २ वाजून २३ मिनिटांनी सुरु होईल ते ४ वाजून २ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर अभिजित मुहूर्त ११ वाजून १८ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ११ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज सूर्याचे कर्क राशीत गोचर होणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाणार चला जाणून घेऊ…

दैनिक पंचांग व राशिभविष्य, १६ जुलै २०२६ (Today Horoscope 16 July 2026 In Marathi)

आजचे मेष राशीचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)

सकारात्मक उर्जेने काम करावे. कौटुंबिक पाठिंबा मिळेल. छुप्या शत्रूंवर मात करता येईल. आजचा दिवस शुभ आहे. मानसिक गोंधळाला आवर घालावी.

आजचे वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)

संयमाची गरज भासेल. अडचणीतून मार्ग काढता येईल. समोरील गोष्टींचा आनंद घ्याल. अनावश्यक खर्च टाळावेत.

आजचे मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

बोलतांना संयम राखावा. मनातील चुकीचे विचार बदलून टाका. कौटुंबिक जबाबदारी ठामपणे पेलावीत. आत्मविश्वास कायम ठेवा. कामात घाई गडबड करू नका.

आजचे कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)

थोरांचे विचार जाणून घ्या. भावंडांचे सहकार्य मिळेल. जवळचे मित्र भेटतील. मानसिक ओढाताण जाणवू शकते. ध्यानधारणेतून सकारात्मक ऊर्जा मिळवा.

आजचे सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)

सडेतोडपणे वागून चालणार नाही. मनाची द्विधावस्था होणार नाही याची काळजी घ्यावी. कौटुंबिक वातावरण सुखकर राहील. योग साधनेकडे मन वळवावे. वैचारिक स्पष्टता ठेवा.

आजचे कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)

ठरवलेल्या गोष्टी पार पाडाव्यात. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. वेळच्या वेळी निर्णय घ्यावेत. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.

आजचे तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)

वैचारिक एकसूत्रता ठेवावी. मनाच्या दोलायमान अवस्थेतून बाहेर पडावे. उगाच चिंता करत बसू नका. वादाचे प्रसंग टाळावेत. चांगली संगत लाभेल.

आजचे वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)

कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी. उगाचच चिडचिड करून चालणार नाही. मानसिक शांतता लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

आजचे धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)

जुनी गुंतवणूक कामी येईल. मन प्रसन्न राहील. नवीन योजनांवर विचार करावा. जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा गोष्टी कराल. एकमेकातील वैचारिक दुरावा मिटेल.

आजचे मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)

चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. वेळेचे महत्त्व लक्षात घ्या. जोडीदाराशी मतभेद संभवतात. दिवस आळसात घालवून चालणार नाही. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

आजचे कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)

योग्य तर्क वापरावा लागेल. भांडणापासून दूर राहावे. तडकाफडकी कोणतीही कृती करू नका. मनातील नकारात्मक विचार काढून टाकावेत. नामस्मरण करणे हिताचे ठरेल.

आजचे मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)

वाहन वेगावर मर्यादा घालावी. संयम सोडून वागू नका. जोडीदाराच्या मताचा विचार करावा. अनावश्यक खर्च टाळावा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर