ashadhi ekadashi 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन आणि राशी परिवर्तन होते, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ६ जुलै रोजी देवशयनी (आषाढी) एकादशी साजरी केली जाणार असून या दिवशी ग्रहांचा खास संयोग देखील पाहायला मिळेल. या दिवशी गुरू आदित्य राजयोग तसेच साध्य योग, त्रिपुष्कर योग आणि रवि योगदेखील निर्माण होत आहे. या शुभ संयोगाच्या प्रभावाने १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींना फायदा होईल.
आषाढी एकादशीचा दिवशी तीन राशींसाठी खास
कर्क (Kark Rashi)
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आषाढी एकादशीचा दिवस खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. काळात अचानक धनलाभ, भौतिक सुखाची प्राप्ती होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले कामही पूर्ण होण्यास मदत मिळेल. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. भावंडांकडून मदतीचा हात मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल.
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आषाढी एकादशीचा दिवस खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. वडिलांबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल.
धनु (Dhanu Rashi)
धनु राशीच्या व्यक्तींसाठीही आषाढी एकादशीचा दिवस अत्यंत सकारात्मक सिद्ध होईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल. नव्या वस्तू किंवा प्रॉपर्टी खरेदी कराल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)