Arun Gochar Asta 2026: नऊ ग्रहांमध्ये अरुण ग्रहाचा समावेश नाही. परंतु ज्योतिषशास्त्रात अरुण ग्रहाचे विशेष महत्त्व आहे. अरुण ग्रहाला युरेनस ग्रह देखील म्हणतात, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, अरुण एका राशीत सुमारे सात वर्ष राहतो. अशा प्रकारे, एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी सुमारे ८४ वर्षे लागतात. दरम्यान, २०२६ मध्ये अरुण ग्रहाचे राशी परिवर्तन होणार नाही. तो सध्या वृषभ राशीत असून या वर्षात फक्त दोन वेळा नक्षत्र परिवर्तन करेल. शिवाय या काळात तो अस्त स्थितीत व उदय अवस्थेतही जाईल. देखील होईल. पंचांगानुसार, अरुण ग्रह १० मे २०२६ रोजी संध्याकाळी ०७ वाजून ५१ मिनिटांनी अस्त होईल आणि ०१ जून २०२६ रोजी पहाटे ०५ वाजून २७ मिनिटांनी या स्थितीतून बाहेर येईल. ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या आयुष्यावर पाहायला मिळेल.

अरुण ग्रहाची अस्त स्थिती नशीब बदलणार (Arun Asta in May)

मकर (Makar Rashi)

या राशीच्या व्यक्तीवरदेखील अरूणाची कृपा होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींवरही अरूण ग्रह प्रसन्न असेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना खूप यश मिळेल.

वृषभ (Vrushabh Rashi)

वृषभ राशीच्या व्यक्तींवर अरूणाची विशेष कृपा असणार आहे. या काळात तुमच्या नशीबाची साथ मिळेल. नव्या कल्पनाशक्ती जागृत होतील. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)