Astrology 2022: ३० जानेवारीपासून चार राशींवर असेल बुध ग्रहाची कृपा; जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा ग्रह राशी बदलतो किंवा अस्त आणि उदय होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो.

budh-1-5
Astrology 2022: ३० जानेवारीपासून चार राशींवर असेल बुध ग्रहाची कृपा; जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा ग्रह राशी बदलतो किंवा अस्त आणि उदय होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. ही परिस्थिती काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ असते. २९ जानेवारीला बुध ग्रहाचा उदय होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा बुद्धिमत्ता, व्यवसाय, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मित्राचा कारक आहे. दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीच्या जन्म राशीत बुध ग्रह बलवान असेल तर त्या व्यक्तीची संवाद शैली कार्यक्षम असते. व्यक्ती आपल्या शब्दांनी सर्वांना मोहित करते. बलवान बुध माणसाला तीक्ष्ण बुद्धी देतो. त्यात एखाद्या व्यक्तीची गणना करण्याची शक्ती तीव्र असते. त्यामुळे बुध ग्रहाचा प्रभाव सर्व राशींवर राहणार असला तरी चार राशी आहेत, त्यांना विशेष फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊया या चार राशी कोणत्या आहेत.

मेष: या राशीच्या लोकांसाठी ३० जानेवारीपासून चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण तुमच्या कुंडलीच्या दशम (कर्म) घरात बुधचा उदय होत आहे. तुम्हाला यावेळी नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उत्पन्न वाढेल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. व्यवसायात तुम्ही नवीन करार करू शकता, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो.

वृषभ: बुधाचा उदय या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण तुमच्या कुंडलीच्या नवव्या म्हणजेच भाग्य स्थानाचा बुधचा उदय होत आहे. यामुळे तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते किंवा तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. व्यवसायात लाभाचे संकेत आहेत. आत्मविश्वास वाढेल. तसेच यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

लग्नासाठी सॉफ्टवेअर किंवा मोबाईल अ‍ॅपने कुंडली जुळवणे पुरेसे नाही!, नातं टिकवण्यासाठी ‘या’ बाबी बघणं आवश्यक

धनु: तुमच्या कुंडलीतील दुसऱ्या (संपत्ती) घरात बुधाचा उदय होत आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. यासोबतच तुमच्या धन स्थानात सूर्य, बुध आणि शनि यांचाही योग आहे, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता, ज्यातून भविष्यात लाभ होण्याची चिन्हे आहेत. यावेळी तुम्ही नवीन वाहन घेण्याचा विचार करू शकता.

मीन: बुधाचा उदय या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. कारण बुध तुमच्या संक्रमण कुंडलीच्या अकराव्या स्थानात म्हणजेच मिळकतीच्या स्थानात प्रवेश करेल. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळेल. उत्पन्न वाढेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यवसायात अचानक फायदा होऊ शकतो. या काळात तुम्ही एखाद्याला मदत करू शकता. यासह, यावेळी तुम्हाला अनेक स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Astrology 2022 budh grah uday positive impact on four rashi rmt

Next Story
राशीचक्रातील ‘या’ तीन राशींकडे असते आकर्षक शक्ती; पहिल्या भेटीतच प्रभाव पाडण्यात होतात यशस्वी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी