वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा योग बनतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. फेब्रुवारीमध्ये ग्रहांचा अनोखा संयोग पाहायला मिळणार आहे. फेब्रुवारीच्या शेवटी एकाच राशीत त्रिग्रही, चतुर्ग्रही आणि पंचग्रही योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रात अशी घटना फार दुर्मिळ आहे. त्यामुळे या ग्रहयोगांमुळे पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालावरही परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, पंचग्रही योग सर्व राशींवर परिणाम करेल, परंतु अशा तीन राशी आहेत ज्यांचा विशेष फायदा होऊ शकतो. या महिन्यात अनेक संक्रमणे होणार आहेत, परंतु काही विशेष ग्रहांच्या संक्रमण काळात सांभाळून राहावे लागेल. मंगळ आणि शुक्र हे मुख्य ग्रह आहेत. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य देव मकर राशीत आहे. मात्र १३ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजून १२ मिनिटांनी मकर राशीतून निघून कुंभ राशीत जाईल. पुढील महिन्यात १० मार्च रोजी शुक्र, मंगळ आणि शनि हे तीन ग्रह मकर राशीत असतील. याशिवाय बुध आणि गुरु हे दोन ग्रह कुंभ राशीत राहतील. या दिवशी निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. शनि आधीच मकर राशीत आहे, त्यात मंगळ २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजून ४६ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल. मंगळाचं उच्च स्थान आहे. दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजून ५३ मिनिटांनी शुक्र मकर राशीत प्रवेश करेल, यासोबतच चंद्र आणि बुध देखील या राशीत आधीच असतील. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये मकर राशीत पाच ग्रहांचा पंचग्रही योग तयार होणार आहे. Surya Gochar: १३ फेब्रुवारीला सूर्याचं कुंभ राशीत संक्रमण, चार राशींना मिळणार नशिबाची साथ मेष: या राशीतून दशम म्हणजे कर्म आणि करिअर स्थानात पंचग्रही योग तयार होईल. या काळात तुम्ही व्यवसायात चांगली कमाई करू शकता. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला इन्क्रीमेंट मिळू शकते. या काळात, कामाच्या ठिकाणी चांगल्या कार्यशैलीसाठी तुमची ओळख होईल. तसेच, यावेळी तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली असणार आहे. एकंदरीत पंचगृही होणे तुमच्यासाठी शुभ राहील. वृषभ: तुमच्या राशीच्या नवव्या म्हणजे भाग्य स्थानात पंचग्रही योग तयार होईल. त्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जे काही काम हातात ठेवाल त्याचा फायदा होईल. तसेच तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी वेळ चांगला आहे. आत्ता केलेली गुंतवणूक भविष्यात फायदे देईल. तसेच या काळात धर्म आणि अध्यात्माच्या कार्यात तुमची रुची वाढेल. मीन: तुमच्या राशीतील अकराव्या म्हणजेच आर्थिक स्थानात घरात पंचग्रही योग तयार होत आहे. या काळात तुमचे उत्पन्न वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढतील. खर्चावर नियंत्रण राहील. यावेळी तुम्हाला व्यवसायात अचानक लाभ होऊ शकतो. व्यवसायात नवीन डील फायनल होऊ शकते. तुम्ही नोकरीत असाल तर तुम्हाला वेतनवाढ मिळू शकते. जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्ही चांगली कमाई करू शकता. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो.