ज्योतिषशास्त्रात कोणत्याही ग्रहाचा बदल किंवा वक्री चाल सर्व बारा राशींवर थेट परिणाम करत असतो. २०२२ या वर्षात अनेक ग्रहांचा राशी बदल होणार आहे. या यादीत कर्म आणि न्यायदेवता शनिचाही समावेश आहे. शनिदेव ५ जूनपासून आणि २३ ऑक्टोबरपर्यंत वक्री असतील. शनि वक्री असल्याने चार राशींवर परिणाम दिसून येईल.

  • कर्क- शनि ग्रहाच्या वक्री चालीमुळे कर्क राशीच्या लोकांवर प्रभाव दिसून येईल. कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागेल. कर्क ही चंद्र ग्रहाची रास आहे. चंद्र आणि शनि यांच्या शत्रुत्वाची भावना आहे. त्यामुळे पैशांच्या संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
  • वृश्चिक- या काळात या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बिघडू शकते. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ आणि शनि यांच्यातही शत्रुत्वाची भावना आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

Astrology 2022: धनु राशीत शुक्र आणि मंगळाची युती; या तीन राशींसाठी चांगला योग

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
27 March Daily Mesh To Meen Rashi Bhavishya
२७ मार्च पंचांग, राशी भविष्य: कुणाच्या नशिबी नात्यांचं प्रेम, सुख व गोडवा तर कुणाची वाढेल डोकेदुखी, आज काय होणार?
shukra asta 2024
एप्रिल महिन्यात मेष राशीत शुक्र होणार अस्त! ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पटलणार! आयुष्यात येईल प्रेम करणारी व्यक्ती
  • सिंह- या राशीच्या लोकांचं खर्चात या काळात अनपेक्षित वाढ होईल. आरोग्यविषयक समस्या जाणवेल. त्यामुळे खाण्यापिण्याची काळजी घ्या. तसेच कामाच्या ठिकाणी यश मिळवण्यात अडचण येईल.
  • मकर- या राशीच्या लोकांना मित्र आणि संवादाशी संबंधित गोष्टींमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शनि वक्री झाल्यामुळे तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करणे कठीण होईल. कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांना प्रभावित करण्यात अपयशी ठराल. तुम्हाला पायांशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.