ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्राचे संक्रमण सुमारे २३ दिवसांचे असते. म्हणजेच शुक्र एका राशीत सुमारे २३ दिवस राहतो आणि नंतर आपली राशी बदलतो. शुक्र ग्रह शुभ मानला जातो, त्यामुळे जेव्हा हा ग्रह वक्री किंवा मार्गस्थ असतो तेव्हा त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या वर्तनावर आणि स्वभावावर होतो. शुक्र ग्रह हा जीवनातील भौतिक सुखांचा कारक मानला जातो, कारण त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीला सुख-विलास, कीर्ती, कला, प्रतिभा, भौतिक सुख, वैवाहिक सुख, सौंदर्य, प्रणय, लैंगिक वासना इत्यादी प्राप्त होतात. शुक्राचे संक्रमण हे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्वाचं मानलं जातं. याचा प्रभाव प्रत्येक मनुष्याच्या जीवनात शुभ किंवा अशुभ मार्गाने दिसून येतो. शुक्र धनु राशीत (२९ जानेवारी २०२२) मार्गी होत आहे. कोणत्या राशींवर काय परिणाम होईल जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कन्या: कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्र दुसऱ्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे आणि आता शुक्र तुमच्या चौथ्या भावात असेल. हा काळ खूप शुभ असेल. मात्र तुमच्या खर्चात काही प्रमाणात वाढ होण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे वस्तू खरेदी करताना कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. याशिवाय जे लोक पूर्वीपासून नवीन घर किंवा वाहन घेण्याचा विचार करत होते, त्यांना या काळात शुक्राच्या कृपेने अनुकूल संधी मिळणार आहेत.

तूळ: तूळ राशीचा स्वामी असण्याव्यतिरिक्त शुक्र आठव्या भावाचा मालक आहे. या काळात तुमच्या तिसऱ्या भावात प्रवेश करेल. शुक्र हा तुमचा राशीचा स्वामी असल्याने आणि आता तुमच्या तिसऱ्या घरात असल्यामुळे तुम्हाला संमिश्र परिणाम मिळणार आहेत. या काळात तुमचे शत्रू सतत तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. लांबचा प्रवास त्रासदायक ठरू शकतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणीही खूप काळजी घ्यावी लागेल. याशिवाय आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

वृश्चिक: शुक्र वृश्चिक राशीच्या बाराव्या घरात आणि सातव्या घरावर राज्य करतो. या काळात तो तुमच्या राशीत संपत्तीच्या दुसऱ्या स्थानाकडे मार्गस्थ होईल. यावेळी, शुक्र, तुमच्या दुसर्‍या घरात आधीपासूनच उपस्थित असलेल्या मंगळाच्या संयोगाने तुमच्या राशीत धन योग तयार करेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. पण खर्चावर नियंत्रण ठेवा. विवाहित लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, शक्य तितकी शांतता ठेवा.

Astrology 2022: एक आठवड्यानंतर बुध ग्रहाचं संक्रमण; या राशींच्या लोकांना होणार फायदा

मकर : मकर राशीच्या लोकांसाठी शुक्र तुमच्या पाचव्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे. मकर राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रह बाराव्या भावात असतील. अशा स्थितीत तुमच्या बाराव्या घरात शुक्राचा प्रवास तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे. परंतु या काळात कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहावे लागेल. या काळात शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology 2022 shukra grah transit impact on rashi rmt
First published on: 28-01-2022 at 13:32 IST