Astrology: ‘या’ राशीच्या लोकांना असते जास्त बोलण्याची सवय! अनेकदा करून घेतात स्वतःचं नुकसान

हे लोक कधी कधी खूप बोलण्याच्या सवयीमुळे स्वतःचं नुकसान करून घेतात.

zodiac sign are leader
संग्रहित फोटो

Astrology, Zodiac Sign: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. त्यांच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात. कोणत्याही व्यक्तीची राशी, ग्रहस्थिती यांच्या आधारे कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य जाणून घेता येते. राशीनुसार काही लोक स्वभावाने शांत असतात. त्याच वेळी, काही लोकांना खूप बोलण्याची सवय असते. अनेक वेळा या लोकांच्या या सवयीमुळे त्यांच्यासाठी समस्या निर्माण होतात. हे लोक कधी कधी खूप बोलण्याच्या सवयीमुळे स्वतःचं नुकसान करून घेतात. चला जाणून घेऊया या राशींबद्दल.

वृषभ (Taurus)

ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा अधिपती ग्रह शुक्र आहे. आणि या राशीवर या ग्रहाचा प्रभाव स्पष्टपणे दिसत आहे. जेव्हा वृषभ राशीच्या कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर असतो, किंवा राहू किंवा केतू ग्रहांनी त्रस्त असतो, तेव्हा या लोकांचा जिभेवरील ताबा सुटतो आणि काहीही विचार न करता कोणालाही ते बोलतात.

(हे ही वाचा: Lunar Eclipse 2022: ‘या’ राशींना चंद्रग्रहणामुळे करिअरमध्ये होऊ शकते प्रचंड प्रगती, धनलाभाचे आहेत योग!)

कन्या (Virgo)

या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध ग्रहाचा संबंध वाणीशी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या राशीचे लोक त्यांच्या भाषा आणि बोलीबद्दल खूप जागरूक असतात. पण जेव्हा या राशीच्या लोकांना क्रूर ग्रहांची दृष्टि पडते तेव्हा ते कठोर शब्द बोलू लागतात आणि स्वतःच नात इतरांशी खराब करून घेतात. हे लोक मनातल सगळ कोणालाही सांगायला तयार होतात. या कारणास्तव बरेच लोक त्यांचा गैरवापर करतात. अशा लोकांशी मैत्री करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.

(हे ही वाचा: Zodiac Sign: ‘या’ दोन राशींच्या व्यक्तींचं नेहमीच एकमेकांशी जुळतं, विचारही पटतात!)

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Astrology people of this zodiac sign have a habit of talking too much often do their own harm ttg

Next Story
Chandra Grahan 2022: चंद्रग्रहण लागताच सर्वात आधी करा ‘हे’ काम; देवी लक्ष्मी होईल प्रसन्न
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी