Friendly Zodiac Signs: आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहतो, जे पहिल्यांदाच भेटलेल्या व्यक्तीसोबतही अगदी सहजपणे बोलू लागतात. कोणतीही व्यक्ती नवीन असो किंवा जुनी, तिच्याशी संवाद साधताना त्यांना अजिबात संकोच वाटत नाही. काही लोकांचा स्वभावच इतका मनमिळाऊ आणि प्रेमळ असतो की ते काही मिनिटांतच समोरच्या व्यक्तीशी चांगले संबंध निर्माण करतात. त्यामुळे अशा लोकांची ओळख अनेकदा ‘सगळ्यांशी पटणारे’ अशी होते.
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीच्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व वेगळे असते. काही राशींचे लोक शांत आणि अबोल असतात, तर काही लोक खूपच उत्साही, बोलके आणि मिळून-मिसळून राहणारे असतात. राशिचक्रातील काही राशींच्या व्यक्तींमध्ये इतरांशी सहज संवाद साधण्याचा गुण अधिक असतो. त्यामुळे ते अनोळखी व्यक्तींशीही पटकन मैत्री करतात आणि समोरच्या व्यक्तीलाही त्यांच्यासोबत सहज वाटू लागते. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही राशींबद्दल…
तूळ रास (Libra Horoscope)
संतुलन आणि प्रेम दर्शवणारी तूळ रास असलेले लोक सामाजिक पातळीवरही खूप चांगले असतात. या लोकांना इतरांमध्ये मिसळायला अजिबात वेळ लागत नाही. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्यामुळे ते समोरच्या व्यक्तीशी सहज संवाद साधतात. चांगल्या-वाईट अशा प्रत्येक व्यक्तीसोबत त्यांची सहज पटू शकते. कोणत्याही परिस्थितीत समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
धनु रास (Sagittarius Horoscope)
या राशीचे लोक दूरदृष्टी असणारे असतात. गुरूच्या प्रभावामुळे ते समोरच्या व्यक्तीच्या भावना सहज समजून घेतात आणि त्यामुळे ते इतरांमध्येही पटकन मिसळून जातात. त्यांचा स्वभाव उत्साही आणि मोकळा असल्यामुळे त्यांच्यासोबत बोलताना समोरच्या व्यक्तीलाही संकोच वाटत नाही. त्यांना भेटल्यानंतर अनोळखी व्यक्तीलाही आपलेपणा जाणवतो.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांचा स्वभावही असा असतो की कोणाशीही मिसळताना त्यांना कोणतीही अडचण येत नाही. या राशीचे लोक मोकळेपणाने बोलतात. त्यामुळे ओळखीची व्यक्ती असो किंवा अनोळखी, प्रत्येकालाच त्यांच्याशी बोलताना आपलेपणा जाणवतो. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे ते लवकरच समोरच्या व्यक्तीशी चांगले संबंध निर्माण करतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
