Shash Mahapurush Rajyog : कर्मफळदाता शनि एका निश्चित कालावधीनंतर राशि परिवर्तन करणार आहे. ते एका राशीमध्ये अडीच वर्षापर्यंत राहतात. अशात संपूर्ण एक राशिचक्र पूर्ण करण्यात त्यांना ३० वर्षांचा कालावधी लागतो. शनि आताच्या स्थितीमध्ये, त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये विराजमान आहे. २०२५ पर्यंत शनि कुंभ राशीमध्ये विराजमान राहणार आहे. त्यानंतर शनि मीन राशीमध्ये प्रवेश करणार.
शनि त्याच्या राशीमध्ये विराजमान असल्यामुळे शश नामक राजयोग निर्माण करत आहे. पंचमहापुरुषमध्ये हा राजयोग निर्माण झाल्याने काही राशीच्या लोकांना नशीबाची साथ मिळू शकते आणि घरात सुख समृद्धी नांदू शकते. शश राजयोग निर्माण झाल्याने कोणत्या राशींना फायदा मिळू शकतो.

वैदिक ज्योतिषशास्रानुसार, शश राजयोग पंचमहापुरुष योगांपैकी एक आहे. जेव्हा शनि लग्न किंवा चंद्रापूर्वी चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या भावात तुळ, मकर, आणि कुंभ राशीमध्ये विराजमान असतो, तेव्हा पंचमहापुरुष राजयोग निर्माण होतो. या लोकांना समाजात खूप मान सन्मान मिळतो. या लोकांना कधी पैशाची कमतरता भासत नाही.

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra
१८ वर्षांनंतर मित्र ग्रह शुक्र आणि राहूची युती! ‘या’ राशीच्या लोकांच्या नशीबाचे टाळे उघडणार, मिळेल अपार पैसा
Samsaptak Yog 2025
मिथुन राशीमध्ये निर्माण होतोय समसप्तक, ‘या’ ३ राशींच्या लोक जगतील सुख-समृद्धीचे जीवन, आयुष्यात होईल आनंदी आनंद
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
Mercury in Pisces will create Nichbhang Rajayoga
पैसाच पैसा! बुध ग्रह मीन राशीत निर्माण करणार नीचभंग राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ
Rahu's entry into Saturn's Nakshatra
राहूचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार; पैसा आणि ऐश्वर्याचे सुख

हेही वाचा : shukra-shani Yuti : २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींवर धन-सुखाची बरसात; शुक्र-शनी युतीने प्रेमात यश अन् नोकरी, व्यवसायातून मिळेल बक्कळ पैसा

वृषभ राशी (Vrishabha Zodiac)

या राशीच्या दहाव्या स्थानावर शनि विराजमान आहे. या राशीच्या लोकांसाठी शश राजयोग चारही बाजूने पैसा आणू शकतो. या लोकांना आकस्मिक धन लाभ होऊ शकतो. नवीन घर, वाहन, संपत्ती किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता. जीवनात नवीन आनंद मिळू शकतो. करिअरच्या बाबतीत हे लोक मोठा निर्णय घेऊ शकतात ज्यामुळे येणार्‍या काळात या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. पैशांची बचत करण्यात हे लोक यशस्वी ठरू शकतात.

तुळ राशी (Tula Zodiac)

तुळ राशीच्या लोकांसाठी शश राजयोग लाभदायक ठरू शकते. या राशीच्या पाचव्या स्थानावर शनि विराजमान आहे. अशात या राशीच्या लोकांना भौतिक सुख प्राप्त होऊ शकते. तसेच या लोकांना पद प्रतिष्ठेबरोबर मान सन्मान मिळू शकतो. या लोकांचे काम पाहून वरिष्ठ कौतुक करतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय उत्तम जात आहे. या राशीचे लोक जर स्पर्धा परिक्षेची तयारी करत असेल तर त्यांना यश मिळू शकते. कार्य क्षेत्रात खूप लाभ मिळू शकतो.

हेही वाचा : Kark Rashifal 2025: कर्क राशीसाठी कसे असेल नववर्ष २०२५? कोणत्या ग्रहाचे गोचर ठरणार लाभदायी, कोणाची होईल कृपा?

मकर राशी (Makar Zodiac)

मकर राशीच्या लोकांसाठी शश राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टींमध्ये यश मिळू शकते. दीर्घ काळापासून अडकलेले काम पुन्हा सुरू करता येईल. अप्रत्यक्ष धन लाभाचे योग जुळून येईल. जीवनात अनेक आनंद मिळू शकतो. कामाचे कौतुक केले जाईल. सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल ज्यामुळे हे लोक त्यांचे ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी होतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader