ज्योतिष शास्त्रात शुक्र ग्रह एक महत्त्वपूर्ण ग्रह आहे. ब्रह्मांडातील ग्रहांच्या स्थितीत जेव्हा जेव्हा बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम मानवावरही होतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राचा संबंध सुख-सुविधांशी सांगितला आहे. यासोबतच शुक्र प्रेम, प्रणय, मनोरंजन, फॅशन, परदेश इत्यादींचा कारक आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा शुक्राच्या हालचालीत बदल होतो तेव्हा त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. जेव्हा एखादा ग्रह सूर्य ग्रहाजवळ येतो किंवा सूर्याच्या अंशापासून 10 अंशाच्या आसपास येतो, तेव्हा ग्रह अस्त होतो असं ज्योतिषशास्त्रात म्हणतात. पंचांगानुसार ६ जानेवारी २०२२ ते १४ जानेवारी २०२२ पर्यंत शुक्र ग्रह अस्त असेल. १४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ५.२९ वाजता शुक्राची अस्त समाप्त होईल. जेव्हा शुक्र अस्त होतो तेव्हा शुभ कार्ये होत नाहीत. शुक्र ग्रहाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होतील, जाणून घ्या.

मेष : तुम्ही वाईट संगतीपासून दूर राहावे. महिलांचा आदर करा. फसवणूक करू नका आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. भागीदारीच्या कामात, कठोर परिश्रमांशी सुसंगत परिणाम मिळणार नाहीत. विरोधक तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. लक्ष्मी पूजा तुमच्यासाठी लाभदायक आहे.

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

वृषभ : या राशीच्या लोकांकडून पैसा खर्च होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनैतिक गोष्टींवर पैसे खर्च करू नका. जिभेवर ताबा ठेवा. यावेळी नशीब साथ देत नाही.

मिथुन : व्यवसायात लाभ होऊ शकतो. नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. महिला सहकाऱ्यांशी वाद टाळावेत, सहकार्याचा अभाव असू शकतो. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा महागात पडू शकतो. कर्ज देणं टाळा. जुनाट आजार असल्यास काळजी घ्या.

Astrology 2022: मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे चार राशींवर होणार कृपा; तुमची रास आहे का वाचा

कर्क : कामात अडथळे निर्माण करण्याचे काम शत्रू करू शकतात. मानसिक तणावाची स्थिती टाळा. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. व्यवसायात लक्षणीय नफा मिळण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे तुमचे काम सावधपणे करा. वैवाहिक जीवनात काही तणाव निर्माण होऊ शकतात.

सिंह : नको असलेल्या बदल्यांचे योग आहेत. मुलांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही कोणत्याही व्यवसायाशी निगडीत असाल तर तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात अडचणी येऊ शकतात. अनावश्यक कामात ऊर्जा आणि पैसा खर्च होऊ शकतो.

कन्या : या काळात तुम्ही अनेक नवीन मित्र बनवाल. करिअरच्या दृष्टीने तुम्ही कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी करू शकाल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून सहकार्य आणि प्रोत्साहन मिळेल.खर्चात अचानक वाढ झाल्याने बजेट बिघडू शकते. तणाव टाळा.

Yearly Horoscope 2022: जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्याचं वार्षिक राशीभविष्य; तुमच्या राशीसाठी कसं असेल हे वर्ष जाणून घ्या

तूळ : प्रतिस्पर्धी सक्रिय राहतील आणि व्यवसायातील लाभ स्थानावर परिणाम करू शकतात. मोठी गुंतवणूक करणे टाळा. जोडीदारासोबत काही मतभेद होऊ शकतात. पैशाची आवक थोडी कमी होऊ शकते. यावेळी, तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ क्वचितच मिळेल.

वृश्चिक : मानसिक तणावाची परिस्थिती असू शकते. तुमच्या जीवनसाथीला आनंदी ठेवा आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. यावेळी विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष द्यावे लागेल. त्यांना त्यांच्या वेळेची किंमत समजली पाहिजे. यावेळी वेळ वाया घालवणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

धनु : शुक्र तुमच्याच राशीत अस्त होत आहे. त्यामुळे भविष्यासाठी तुम्ही जी काही योजना करत आहात, त्यावर एकदा लक्ष देणे आवश्यक आहे. उत्कटतेने कोणताही निर्णय घेऊ नका. कामाबाबत थोडी धावपळ होईल.

मकर : तुम्हाला कोणत्याही आजाराने ग्रासले असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषध वापरा. आरोग्याच्या बाबतीत कोणतीही निष्काळजीपणा महागात पडू शकतो. पैशाची काळजी घ्या. सावधगिरीने प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कुंभ : शुक्रामुळे स्थावर मालमत्तेशी संबंधित कामात विलंब होईल. वैवाहिक जीवनातही काही अडचणी येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष लागणार नाही. नशीबाची साथ मिळणं कठीण होईल. प्रेमसंबंधात अडथळे, तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

मीन : इतरांची निंदा करणे टाळा. महिलांचा आदर करा. पैसा हुशारीने खर्च करा. कामात अडथळे येऊ शकतात. धीर धरा. नोकरीत मेहनत केली तर फायदा होईल.