August 2026 Marathi Calendar : ऑगस्ट महिना सुरू व्हायला अवघे दोन दिवस उरले आहेत. धार्मिक दृष्टिकोनातून हा महिना अत्यंत पवित्र व विशेष मानला जातो. या महिन्याची सुरुवात गणरायाच्या कृपेचे प्रतीक असलेल्या संकष्टी चतुर्थीने होणार आहे. त्यानंतर श्रावण महिन्याला प्रारंभ होईल आणि सण-उत्सवांची रेलचेल सुरू होईल. ऑगस्ट महिन्याची सुरुवात आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथीने होणार असून, या महिन्याचा शेवट श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथीने होईल. त्यामुळे व्रत, उपवास आणि सणांच्या उत्साहाने हा संपूर्ण महिना भक्तिमय वातावरणात साजरा केला जाणार आहे. चला, ऑगस्ट महिन्यातील प्रमुख सण-उत्सव, व्रत, श्रावणी सोमवार, मंगळागौरी आणि इतर महत्त्वाच्या सणांच्या तारखा जाणून घेऊयात…

ऑगस्ट महिन्यातील प्रमुख सण-उत्सव

१ ऑगस्ट – बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी
२ ऑगस्ट – संकष्टी चतुर्थी
९ ऑगस्ट – कामिका एकादशी
११ ऑगस्ट – मासिक शिवरात्री
१३ ऑगस्ट – श्रावण मासारंभ
१२ ऑगस्ट – खगास सूर्यग्रहण
१५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन

१६ ऑगस्ट – विनायक चतुर्थी
१७ ऑगस्ट – नागपंचमी, पहिला श्रावणी सोमवार
१८ ऑगस्ट – मंगळागौरी पूजन
२३ ऑगस्ट – पुत्रदा एकादशी
२४ ऑगस्ट – दुसरा श्रावणी सोमवार
२५ ऑगस्ट – मंगळागौरी पूजन
२७ ऑगस्ट – नारळी पौर्णिमा
२८ ऑगस्ट – रक्षाबंधन
३१ ऑगस्ट – तिसरा श्रावणी सोमवार, संकष्टी चतुर्थी

श्रावणी सोमवार यंदा किती ?

स्कंद पुराणानुसार भगवान शंकरांचा आवडता महिना म्हणजे श्रावण. यंदा १३ ऑगस्टपासून श्रावण मासारंभ सुरू होणार आहे आणि १७ ऑगस्ट , २४ ऑगस्ट , ३१ ऑगस्ट , ७ सप्टेंबर या दिवशी अनुक्रमे श्रावणी सोमवार आहेत. सणांचा महिना अशी ओळख असणारा श्रावण हे एका अर्थी उत्साह, चैतन्य यांचे प्रतीक मानला जातो. पण, यातही शिवभक्तांसाठी श्रावणी सोमवारचे महत्त्व अनन्यसाधारण असते. श्रावणातील सोमवारी शंकराच्या पूजेनंतर शिवामूठ वाहण्याचा प्रघात आहे.

तर या आहेत ऑगस्ट महिन्यातील सण-उत्सवांच्या तारखा…