August Astrology Prediction: ज्योतिषशास्त्रानुसार २०२६ मधील ऑगस्ट महिना खूप महत्त्वाचा मानला जात आहे. या महिन्याच्या २८ ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार असून, याच दिवशी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहणही लागणार आहे. याच्या काही दिवस आधी, म्हणजेच २० ऑगस्टला शनिदेव आपली चाल बदलत रेवती नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करणार आहेत. रेवती हे २७वे आणि शेवटचे नक्षत्र असून, त्याचा स्वामी बुध ग्रह आहे.
शनिच्या या नक्षत्र बदलाचा परिणाम सर्व १२ राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येईल. मात्र, काही राशींसाठी हा काळ नशीब बदलणारा ठरू शकतो. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतील आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे स्पष्ट संकेत मिळतील. चला जाणून घेऊया, कोणत्या राशींना या काळात सर्वाधिक फायदा होणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे, तर अनावश्यक खर्च कमी होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
कमाईचे नवीन मार्ग खुलतील. जमीन, घर किंवा नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांत चांगल्या संधी मिळतील, त्यामुळे सुख-सुविधांमध्ये वाढ होईल.
तूळ रास (Libra Horoscope)
नशिबाची उत्तम साथ मिळेल आणि बऱ्याच काळापासून रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जुने कर्ज फेडण्यात यश मिळू शकते. घरात एखादा शुभ किंवा मंगल कार्यक्रम होऊ शकतो.
धनु रास (Sagittarius Horoscope)
तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या उत्तम संधी मिळतील, त्यामुळे आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल.
मकर रास (Capricorn Horoscope)
या काळात तुमचा आत्मविश्वास खूप वाढलेला असेल. प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
