August Horoscope: ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे वेळोवेळी नवपंचम दृष्टी तयार होते. या दृष्टीचा प्रभाव सर्व राशींच्या जीवनावर पाहायला मिळतो.
द्रिक पंचांगानुसार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजून ११ मिनिटांनी सूर्य आणि शनी हे ग्रह १२० अंशांच्या स्थितीत आल्यामुळे नवपंचम दृष्टी तयार होणार आहे. आज आपण अशा ५ राशींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्यासाठी ही नवपंचम दृष्टी फारशी लाभदायक ठरणार नाही.
वृषभ राशी (Taurus Zodiac Signs)
विचार न करता घेतलेले व्यवसाय किंवा नोकरीशी संबंधित निर्णय नुकसानदायक ठरू शकतात. या काळात न्यायालयाशी संबंधित प्रकरणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच तुमचा स्वभाव चिडचिडा होऊ शकतो.
मिथुन राशी (Gemini Zodiac Signs)
विद्यार्थ्यांसाठी हा काळ यश मिळवण्यासाठी फारसा चांगला नाही. त्यामुळे आई-वडिलांकडून रागावलं जाण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसायाला अपेक्षित गती मिळणार नाही, त्यामुळे तणाव वाढू शकतो. कुटुंबातही सुख-शांती टिकून राहणार नाही.
सिंह राशी (Leo Zodiac Signs)
व्यवसायात अपेक्षित प्रगती होणार नाही, त्यामुळे तणाव वाढू शकतो. या काळात आर्थिक स्थितीही फारशी मजबूत राहणार नाही. तसेच कुटुंबातील सदस्यांची साथ न मिळाल्यामुळे तुम्हाला दुःख होऊ शकते आणि स्वतःला एकटं वाटू शकतं.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
