August Horoscope: ग्रहांचा राजा सूर्य ऑगस्ट महिन्यात स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचा सिंह राशीत प्रवेश १७ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३३ मिनिटांनी होईल. सूर्याच्या या राशीबदलाचा देश-विदेशावर चांगला परिणाम दिसून येईल. सिंह राशीतील सूर्याचा प्रभाव मेष ते मीन अशा सर्व राशींवर पडेल. पंडित नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, हा काळ सर्वसामान्यांसाठी लाभदायक ठरेल.

सरकारी यंत्रणेलाही याचा फायदा होईल. या काळात विशेषतः ६ राशींना नशिबाची साथ मिळेल आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. आर्थिक स्थितीतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या, ऑगस्टमध्ये होणारा सूर्याचा सिंह राशीतील प्रवेश कोणत्या ६ राशींसाठी शुभ ठरणार आहे.

सूर्याचा सिंह राशीतील प्रवेश सर्वसामान्यांसाठी कसा राहील?

पंडित उपाध्याय यांच्या मते, सूर्याचा सिंह राशीतील प्रवेश सर्वांसाठी चांगला राहील. सरकारी यंत्रणेसाठीही हा काळ अनुकूल असेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशदायी ठरेल. अनेकांना यश मिळू शकते. जगाच्या दृष्टीनेही हा गोचर शुभ मानला जात आहे.

सूर्याच्या सिंह राशीतील प्रवेशामुळे ‘या’ ६ राशींना होणार फायदा, १७ ऑगस्टपासून बदलतील दिवस

मेष राशी (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचा सिंह राशीतील प्रवेश अत्यंत शुभ राहील. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबीयांची साथ मिळेल. धाडस आणि मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांचे सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होऊ शकतो. व्यवसायात प्रगतीचे योग आहेत.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ यशाने भरलेला राहील. करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. रखडलेली कामे पूर्ण होतील. नशिबाची साथ मिळेल. एखादी आनंदाची बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. जमीन, घर किंवा वाहन खरेदीचे प्रबळ योग आहेत. सरकारी कामांमध्येही लाभ मिळू शकतो.

सिंह राशी (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरेल. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. धनलाभाचे योग आहेत. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट होईल, ज्यामुळे करिअर किंवा व्यवसायात फायदा होऊ शकतो. नशिबाची साथ मिळाल्याने चांगली बातमी मिळेल. आवडत्या ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळू शकते.

तूळ राशी (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. सूर्याच्या प्रभावामुळे मानसिक शांतता मिळेल. पैशांशी संबंधित योजना यशस्वी होतील. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतो. कुटुंबीयांची साथ मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्यांना अपेक्षित बढती आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. या काळात तुम्ही जे ठरवाल ते पूर्ण करण्याची शक्यता आहे. एखादे मोठे स्वप्न पूर्ण होऊ शकते. घरात शुभ किंवा मंगलकार्य होण्याचे संकेत आहेत. व्यवसायात प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर हा काळ चांगले परिणाम देऊ शकतो. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक राहील. कुटुंबाची पूर्ण साथ मिळेल. गरजेच्या सर्व गोष्टी सहज उपलब्ध होतील. मानसिक ताण कमी होईल आणि आयुष्यात सुख-शांतीचा अनुभव येईल. नशीब पूर्ण साथ देईल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अतिशय चांगला मानला जात आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)