Trigrahi Yog: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या युतीला विशेष महत्त्व असते. द्रिक पंचांगानुसार, १७ ऑगस्टपर्यंत कर्क राशीत सूर्य, देवगुरू गुरु आणि बुध हे तिन्ही ग्रह एकत्र राहून अतिशय शुभ ‘त्रिग्रही योग’ तयार करत आहेत. कर्क राशीत गुरु उच्च मानले जातात. तर सूर्य आणि बुध यांच्या एकत्र येण्यामुळे ‘बुधादित्य योग’ देखील तयार होत आहे.
खरं तर, ५ ऑगस्ट रोजी बुधाने कर्क राशीत प्रवेश केला. त्या राशीत आधीपासूनच सूर्य आणि गुरु विराजमान होते. त्यामुळे हा योग ५ ऑगस्टपासून प्रभावी झाला आहे. ग्रहांचा हा दुर्मिळ आणि राजयोगासारखा शुभ संयोग १७ ऑगस्टपर्यंत विशेषतः ३ राशींच्या लोकांना धन, करिअर आणि मान-सन्मानाच्या बाबतीत मोठा लाभ देणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
तुमच्या धैर्यात आणि आत्मविश्वासात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयांचे कौतुक होईल आणि नवीन संधी मिळतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. लहान भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
हा योग तुमच्या स्वतःच्या राशीत (प्रथम भावात) तयार होत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वात चांगला बदल दिसून येईल आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात मोठा नफा होण्याचे योग आहेत. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. आरोग्यातही सुधारणा दिसून येईल.
कन्या रास (Virgo Horoscope)
तुमच्या राशीच्या अकराव्या (लाभ) भावात हा योग तयार होत असल्याने आर्थिक लाभाचे योग अधिक मजबूत होतील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेल्या योजना आता वेगाने पुढे जातील आणि यश मिळवून देतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. तसेच संततीकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.
इतर राशींवर कसा होईल परिणाम?
त्रिग्रही योगाच्या शुभ प्रभावामुळे मेष, तूळ आणि धनु राशीच्या लोकांनाही नोकरीत सकारात्मक बदल आणि आर्थिक स्थिरता मिळू शकते. मात्र मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी या काळात खर्चावर नियंत्रण ठेवावे आणि पैशांचे व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
