Baba Vanga Prediction 2026 Horoscope: बाबा वेंगा यांच्या २०२६ या वर्षासाठी केलेल्या भविष्यवाण्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. बाबा वेंगा या बुल्गारियातील एक महिला होत्या, ज्यांना त्यांच्या अचूक भविष्यवाण्यांसाठी ओळखले जाते. त्यांनी स्वतःच्या मृत्यूचीही भविष्यवाणी आधीच केली होती. अनेक वर्षांपासून त्यांच्या अनेक भविष्यवाण्या खर्‍या ठरल्या आहेत.

आता २०२६ वर्षाबद्दल त्यांनी केलेल्या काही भविष्यवाण्या लोकांमध्ये थोडी चिंता आणि उत्सुकता निर्माण करत आहेत. माहितीसाठी सांगायचं झालं तर बाबा वेंगा यांचं निधन १९९६ साली झालं होतं. तरीही आजही जगभरात त्यांच्या भविष्यवाण्यांची चर्चा सुरू असते.

त्यांनी अनेक वर्षांसाठी युद्ध, रोगराई आणि इतर मोठ्या घटनांबद्दल सांगितले होते. आता २०२६ सुरू होण्यासाठी फक्त दोन महिने शिल्लक आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या या भविष्यवाण्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. या वर्षासाठी त्यांनी महायुद्ध, आर्थिक संकट आणि इतर अनेक मोठ्या गोष्टींची भविष्यवाणी केली आहे. चला तर मग पाहूया, त्यांनी २०२६ या वर्षाबद्दल नेमकं काय सांगितलं आहे.

सन २०२६ मध्ये मोठं युद्ध होणार का?

२०२६ साली होणाऱ्या सर्वात जास्त चर्चेत असलेल्या भविष्यवाण्यांपैकी एक म्हणजे एक मोठं युद्ध, जे पूर्वेकडून सुरू होईल आणि संपूर्ण जगात पसरून पश्चिमेचा “नाश” करेल. काही लोकांचं म्हणणं आहे की, ही भविष्यवाणी एका अशा संघर्षाची चेतावणी आहे, जो जगातील सत्तेचं संतुलन कायमचं बदलू शकतो. हे युद्ध जगभरात मोठा बदल घडवून आणेल. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, २०२६ साली रशियातून एक शक्तिशाली नेता उभा राहील, जो जगावर प्रभाव टाकू शकतो. त्याला “Lord of the World” म्हणजेच जगाचा सर्वात शक्तिशाली स्वामी म्हणून ओळखलं जाईल.

बाबा वेंगा यांनी दिला आर्थिक अडचणींचा इशारा

बाबा वेंगा यांच्या मते, हे युद्ध राजकीय आणि आर्थिक बदल घडवून आणणार आहे. म्हणजेच काही देश या काळात आर्थिक अडचणीत सापडू शकतात. त्याचबरोबर महागाईही वाढताना दिसेल. सध्या देखील अनेक देश तणावाचा सामना करत आहेत. दुसरीकडे सतत वाढणारे सोन्याचे दर लोकांच्या चिंतेत भर घालत आहेत. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनंतर असा अंदाज वर्तवला जातो की २०२६ साली सोन्याचे दर आणखी वाढू शकतात. तसेच या वर्षी अनेक नैसर्गिक आपत्तीही येऊ शकतात. हवामान बदल आपल्या टोकावर असेल. जगातील अनेक भागांमध्ये पूर आणि उकाडा (लू) यांसारख्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. काही ठिकाणी भूकंपामुळे मोठी हानीही होऊ शकते.

एआय मानवी जीवनावर अधिराज्य गाजवेल

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, २०२६ साली एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणखी शक्तिशाली होईल. याचा परिणाम नोकऱ्यांवर दिसून येईल. एआयमध्ये होणारे बदल मानवी जीवनात अनेक अडचणी निर्माण करू शकतात. एआय खूप वेगाने बदल घडवून आणेल. हे बदल इतके मोठे असतील की त्यावर नियंत्रण ठेवणं माणसासाठी सोपं राहणार नाही. सध्या देखील एआयमुळे अशीच परिस्थिती दिसून येते आहे. एआयमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या आधीच गेल्या आहेत.

२०२६ मध्ये एलियन्सशी संपर्क होईल का?

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, दुसऱ्या जगाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र, याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. असा प्रयत्न मानवजातीसाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरू शकतो. तरीसुद्धा, या भविष्यवाणीसाठी कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)