Baba Vanga Weekly Horoscope: जगभरात आपल्या कथित भविष्यवाण्यांमुळे चर्चेत असलेल्या बाबा वेंगा यांचे नाव आजही लोकांमध्ये उत्सुकतेचा विषय आहे. त्यांच्या भविष्यवाण्यांची स्वतंत्रपणे पुष्टी करता येत नसली, तरी त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टींची वेळोवेळी चर्चा होत असते. अशाच काही मान्यतांनुसार येणारा आठवडा म्हणजे ६ ते १२ जुलै हा काळ वृषभ, कन्यासह ५ राशींसाठी सकारात्मक संधी घेऊन येऊ शकतो.
या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय, आर्थिक बाबी आणि कौटुंबिक जीवनात नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. तसेच अनेक समस्यांमधूनही दिलासा मिळू शकतो. चला जाणून घेऊया, ६ ते १२ जुलैसाठी करण्यात आलेल्या बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार कोणत्या राशींसाठी हा आठवडा लाभदायक ठरू शकतो…
वृषभ राशी (Taurus Horoscope)
बाबा वेंगा यांच्या मते, वृषभ राशीच्या लोकांसाठी ६ ते १२ जुलैदरम्यान नवीन संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची ओळख वाढेल आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा फायदेशीर व्यवहारांचा लाभ मिळू शकतो.
वृषभ राशीच्या लोकांच्या सासरच्या बाजूची परिस्थिती सुधारेल आणि जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. बराच काळ रखडलेले एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. करिअरची नवीन सुरुवात करण्याची संधीही मिळू शकते. आर्थिक स्थिती आधीपेक्षा चांगली राहण्याची शक्यता असून कुटुंबाचे सहकार्य तुमचा आत्मविश्वास वाढवेल.
कन्या राशी (Virgo Horoscope)
बाबा वेंगा यांच्या मते, कन्या राशीच्या लोकांसाठी ६ ते १२ जुलै हा काळ मेहनतीचे चांगले फळ देणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ अनुकूल मानला जात आहे.
कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. त्यामुळे घर किंवा वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकते. आर्थिक स्थितीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे. मात्र गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घेतल्यास फायदा होऊ शकतो. कुटुंबातील सुख-सुविधा वाढतील आणि आई-वडिलांची तब्येत चांगली राहील.
तूळ राशी (Libra Horoscope)
बाबा वेंगा यांच्या मते, तूळ राशीच्या लोकांसाठी ६ ते १२ जुलै हा काळ यश आणि संतुलनाचा ठरू शकतो. व्यवसायात काही अडचणी सुरू असतील, तर त्या या आठवड्यात दूर होऊ शकतात. तसेच बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे.
व्यवसाय वाढवण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. धार्मिक कामांमध्ये मन लागेल आणि समाजात मान-सन्मानही वाढू शकतो. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले काम किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि एखादी चांगली बातमी मिळाल्याने मन आनंदी होईल.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
बाबा वेंगा यांच्या मते, धनु राशीच्या लोकांसाठी ६ ते १२ जुलै हा काळ नवीन यश मिळवून देणारा ठरू शकतो. प्रेमसंबंधांमध्ये काही अडचणी असतील, तर त्या या आठवड्यात दूर होऊ शकतात. बराच काळ ज्या कामाची वाट पाहत होतात, त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठीही हा काळ उत्साहवर्धक ठरू शकतो. परदेशात जाण्याची इच्छा असेल, तर तीही पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात. तसेच प्रवासातूनही फायदा होण्याची शक्यता आहे.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
बाबा वेंगा यांच्या मते, कुंभ राशीच्या लोकांना ६ ते १२ जुलैदरम्यान नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. एखाद्या वादात अडकले असाल, तर त्यातून सुटका होण्याची शक्यता आहे. तसेच कर्ज असेल, तर ते फेडण्यासाठी पैसे मिळण्याचे मार्ग खुलू शकतात. नोकरी करणाऱ्यांना करिअरमध्ये पुढे जाण्याच्या नवीन संधी मिळू शकतात आणि रखडलेल्या कामांना गती मिळेल. व्यवसायातही फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि मित्रांचे सहकार्य मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. एखादी नवीन योजना सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
