Baba Vanga Predictions About Gold Prices 2026: बल्गेरियन भविष्यवक्ता बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या सोशल मीडियावर व्हायरल होतात. दुसरे महायुद्ध, ११ सप्टेंबरचा हल्ला आणि त्सुनामी यासारख्या घटनांशी बाबा वेंगा यांच्या काही भविष्यवाण्या जुळतातही. सोन्याच्या किमतीबद्दलही बाबा वेंगा यांच्या अलिकडच्या भविष्यवाण्यांमुळे खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण कालांतराने सोने आणि चांदीची किंमत वाढत आहे. सोन्याच्या किमतीबाबत बाबा वेंगा यांनी केलेली भाकितं मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. बाबा वेंगा यांनी २०२६ वर्षाबाबत अनेक भाकितं केली आहेत. यामध्ये नैसर्गिक आपत्ती, जागतिक संघर्ष, हवामान बदल, एलियन्स आणि एआय तंत्रज्ञानातील प्रगती यांचा समावेश आहे.
सोने आणि चांदीच्या दरांना गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत बाजारापासून ते परदेशी बाजारांपर्यंत तेजी पाहायला मिळाली आहे. २०२५च्या दिवाळीनंतर भारतीय स्थानिक बाजारात किंचित घसरण झाली असली, तरी एकूण वाढीच्या तुलनेत ही घसरण फारच कमी आहे. गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
बाबा वेंगा यांना बाल्कन राष्ट्रांचे नॉस्त्रेदमस म्हटले जाते. भविष्याचा अचूक अंदाज लावण्याच्या त्यांच्या क्षमतेसाठी त्या प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १९११ रोजी झाला, तर ११ ऑगस्ट १९९६ रोजी त्यांचे निधन झाले. सोन्याच्या किमतींबाबत बाबा वेंगा यांनी मोठी भविष्यवाणी केली होती. ती भविष्यवाणी खरी ठरेल की नाही अशी चर्चा सध्या सुरू आहे.
सोन्याच्या किमतीत अलिकडेच झालेली मोठ्या वाढीवरून बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरते. भू-राजकीय संघर्ष, आर्थिक समस्या आणि शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे निर्माण झालेली जागतिक अनिश्चितता यामुळे अनेक गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीकडे वळले आहेत. गेल्या १० वर्षांमध्ये जगभरातील मध्यवर्त बँकांनी खरेदी केलेल्या सोन्याचे प्रमाणही वाढले आहे. एकूण जागतिक कर्ज अंदाजे ३३८ डॉलर ट्रिलियन आहे. हे जगाच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. जागतिक कर्जात वाढ झाल्याने बाजारात एक मोठा बुडबुडा तयार होत असल्याची भीती निर्माण झाली आहे. तो फुटला तर आणखी एक मोठं संकट निर्माण होऊ शकतं.
गुंतवणूकदार सोन्याला कमी जोखीम असलेली सुरक्षित गुंतवणूक मानतात. सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने आता अनेकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. बाबा वेंगाचे भाकित लक्षात घेता अनेक जण ऐतिहासिक आकडेवारीच्या आधारे सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ होईल का असा अंदाज लावत आहेत.
बुधवारी सोने आणि चांदीच्या किमतीत नवीन विक्रमी उच्चांक गाठला, कमकुवत अमेरिकन डॉलर आणि ग्रीनलँड संकटामुळे वाढत्या तणावामुळे सुरक्षित निवासी मागणीमुळे ही वाढ झाली आहे. सुरक्षित निवासी मागणीमुळे सोन्याची मागणी वाढत असल्याने स्पॉट सोन्याच्या किमतींनी पहिल्यांदाच प्रति औंस ४,८०० डॉलर्सचा टप्पा ओलांडला. चांदीच्या किमती देखील प्रति औंस ९५.८७ डॉलर्सच्या उच्चांकावर पोहोचल्या.
एमसीएक्सवर सोन्या-चांदीचा भाव
बुधवारी एमसीएक्स सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १ लाख ५१ हजार ५७५वर उघडले, ते मागील सत्रात दीड लाखांवर होते. एमसीएक्स चांदीचे दर प्रति किलो ३ लाख २२ हजार ५६६ वर उघडले, ते मागील सत्रात ३ लाख २३ हजार ६७२वर होते. आजही चांदी नवीन उच्चांकावर पोहोचण्याची शक्यता आहे.
सध्याचे सोन्या-चांदीचे दर पाहता बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरते की काय याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. बाबा वेंगा यांना नॉस्त्रेदमस असेही म्हटले जाते. त्यांच्या जवळपास ८५ टक्के भविष्य वाण्या खऱ्या ठरल्या आहेत. १९९६ साली त्यांचे निधन झाले. मात्र त्यांनी केलेल्या भविष्यवाण्यांमुळे आजही तज्ज्ञांना सतर्कता बाळगावी लागते.
दरम्यान, बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार आर्थिक संकटाचा परिणाम पारंपरिक बँकिंग प्रणालीवर होऊ शकतो. त्यामुळे लोक सोन्यासारख्या भौतिक मालमत्तेकडे धावतील. सोन्याच्या किमती २५ ते ४० टक्क्यांनी वाढू शकतात असे बाबा वेंगा यांनी त्यांच्या भविष्यवाणीत म्हटले होते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
