Baba Vanga Predictions 2026: २०२५ हे वर्ष संपत आहे आणि प्रत्येकजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहे. वर्षाच्या शेवटी सामान्यतः नॉस्ट्राडेमस आणि बाबा वांगा सारख्या भविष्यवेत्त्यांच्या भविष्यवाण्यांबद्दल चर्चा होतात. बाबा वांगा यांचे खरे नाव व्हँजेलिया पांडेवा गुश्तेरोवा होते आणि अंधत्व असूनही, ती अचूक भाकिते सांगून भविष्य सांगू शकत होती. भविष्यवेत्ती बाबा वेंगांनी तर पुढील वर्षांसाठी अजून खतरनाक भविष्यवाणी केली आहे. बल्गेरियाची रहस्यमय महिला बाबा वेंगा यांनी जगाबाबत अनेक भाकिते केली आहेत आणि त्यातील अनेक खरेही ठरली आहेत. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला होता. बाबा वेंगा यांनी वयाच्या बाराव्या वर्षी दृष्टी गमावल्यानंतर लगेचच त्यांच्याकडे ज्योतिषीय क्षमता असल्याचा दावा केला होता. बाबा वेंगा आता त्यांच्या भाकितासाठी, विशेषतः ९/११ च्या हल्ल्यांबद्दल, राजकुमारी डायनाचा मृत्यू आणि चीनच्या विस्ताराबद्दल, जगभरात प्रसिद्ध आहेत आणि ही भाकिते भूतकाळात खरी ठरली होती, ज्यामुळे सर्व लोकांना त्यांच्या भाकितांवर विश्वास आहे.
बाबा वेंगा ज्यांच्या भयानक आणि रहस्यमय भविष्यवाण्या जागतिक चर्चेचा विषय बनल्या आहेत, ती भयानक आणि रोमांचक आहे.१९९६ मध्ये त्यांच्या मृत्यूपूर्वी, त्यांनी ५०७९ पर्यंत भाकिते केली होती.बाबा वेंगाची भाकितं नैसर्गिक आपत्तींपासून ते तिसरे महायुद्ध, मानवी अधोगती आणि बहुआयामी तांत्रिक प्रगतीपर्यंत आहेत. सोशल मीडियावरील अनेक लोक आता २०२६ साठी बाबा वांगाच्या भाकितं जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.२०२६ सालासाठी त्यांनी कोणती भविष्यवाणी केली आहे ते जाणून घेऊयात.
तिसरे महायुद्ध
बाबा वांगाच्या सर्वात मोठ्या भविष्यवाण्यांपैकी एक म्हणजे तिसऱ्या महायुद्धाबद्दल आहे, जे २०२६ मध्ये सुरू होऊ शकते असे तिने म्हटले आहे. चीनच्या तैवानवर संभाव्य कब्जा, वाढती शत्रुत्व आणि रशिया आणि अमेरिका यांच्यातील थेट संघर्ष यासह वाढत्या जागतिक तणावांबद्दल तिने इशारा दिल्याचे मानले जाते.
एआय बद्दलचे धक्कादायक भाकित
आणखी एका धक्कादायक भाकितात, तिने दावा केला की पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये मानव एलियन्सशी संपर्क साधेल आणि पृथ्वीच्या वातावरणात एका मोठ्या अंतराळयानाच्या आगमनाचा उल्लेख केला. बाबा वांगा यांनी एआय बद्दलही भाकित केले. तिने सांगितले की एआय हा २०२६ मध्ये जगाचा नवा मालक होऊ शकतो. कारण, २०२६ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता मोठी झेप घेऊ शकते. एआय इतक्या वेगाने प्रगती करेल की ते मानवी जीवनातील महत्त्वाच्या पैलूंवर नियंत्रण ठेवू शकेल आणि कदाचित मानवी निर्णय घेण्यावरही वर्चस्व गाजवू शकेल. असाही दावा केला जात आहे की बाबा वांगा यांनी २०२६ मध्ये भूकंप, पूर, त्सुनामी आणि अति उष्णतेची भविष्यवाणी केली आहे.
