Baba Vanga Weekly Horoscope August 3 to 9: जगभरात प्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या आजही अनेकांच्या चर्चेचा विषय ठरतात. त्यांच्या नावाशी जोडल्या जाणाऱ्या विविध दाव्यांमुळे अनेकजण भविष्यातील घडामोडी जाणून घेण्यास उत्सुक असतात. ज्योतिषशास्त्रीय मान्यतांनुसार, ३ ते ९ ऑगस्ट हा कालावधी काही राशींसाठी विशेष अनुकूल ठरू शकतो. या काळात काही महत्त्वाची कामे मार्गी लागण्याची, आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची, तसेच करिअर आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुढचे ७ दिवस ‘या’ राशींसाठी ठरू शकतात लाभदायक; धनलाभाचे संकेत
मेष
या आठवड्यात आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे हळूहळू पूर्ण होण्यास सुरुवात होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगली संधी मिळण्याची शक्यता असून, प्रतिष्ठित संस्थेकडून प्रस्ताव येऊ शकतो. कार्यालयातील वरिष्ठ आणि सहकाऱ्यांशी संबंध अधिक दृढ होऊ शकतात. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि एखाद्या शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
कर्क
सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह अनुभवण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात आणि फायदेशीर व्यवहार होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत दिसू शकतात. आर्थिक स्थिती अधिक मजबूत होऊ शकते. घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न राहण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणुकीबाबत चांगल्या संधी मिळू शकतात आणि भविष्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते.
कन्या
हा आठवडा अनेक दृष्टीने अनुकूल ठरू शकतो. मन शांत राहील आणि सकारात्मक विचारांना चालना मिळेल. घर किंवा वाहन खरेदीचा विचार करत असाल, तर त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या कामाचे कौतुक होईल. वैवाहिक जीवनातील मतभेद कमी होऊन नात्यात पुन्हा विश्वास निर्माण होऊ शकतो. आर्थिक प्रगतीची चिन्हे दिसतील. समाजात प्रतिष्ठा वाढण्याची आणि नवीन ओळखी निर्माण होण्याचीही शक्यता आहे.
धनू
भाग्याची साथ मिळाल्याची जाणीव या आठवड्यात होऊ शकते. करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुलण्याची शक्यता असून, मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयीन किंवा प्रलंबित प्रकरणांमध्ये दिलासा मिळू शकतो. प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये यश मिळू शकते.
मीन
हा आठवडा अनेक आनंददायी घडामोडी घेऊन येऊ शकतो. मित्रांच्या सहकार्याने अनेक रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळू शकतात, त्यामुळे आर्थिक ताण कमी होईल. नोकरीत नवीन संधी मिळू शकते किंवा पदोन्नतीची शक्यता निर्माण होऊ शकते. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि भविष्यातील योजनांना गती मिळू शकते. मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवण्याचीही शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
