Sunetra Pawar vs Supriya Sule, Ajit Pawar Effect: Sunetra Pawar vs Supriya Sule, Ajit Pawar Effect: अटतटीच्या ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. आतापर्यंत (दुपारी ४ वाजून २९ मिनिटांपर्यंत) सुप्रिया सुळे यांना २ लाख ४९ हजार ८१२ मते मिळाली आहेत. तर, अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना २ लाख २० हजार ४७७ मते मिळाली आहेत. या दोन्ही उमेदवारांमध्ये २९ हजार ३३५ मतांचा फरक आहे. त्यामुळे बारामतीचा गड सुप्रिया सुळे राखतात की त्यांच्या वहिनी सुनेत्रा पवार राखतात हे पाहावं लागणार आहे. अजूनही मतमोजणीच्या काहीफेऱ्या शिल्लक असताना सुप्रिया सुळे यांचं पारडं जड दिसतंय. उल्लेखनीय बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या कुंडलीतील बदलांवरून केलेली भविष्यवाणी खरी होताना दिसत आहे.

ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी सांगितले होते की. अजित पवारांच्या पत्रिकेत षष्टात कुंभ राशीतील शनीचे वास्तव्य खूपच वेदनादायक ठरेल. पत्रिकेत शनी मंगळ समोरासमोर आहेत. कौटुंबिक स्थानात जन्मस्थ शनी असल्याने नातेवाईकांमध्ये नाराजीचा सूर कायम असेल. तर मंगळाच्या प्रभावाने अपेक्षा उंचावलेल्या असतील पण त्यातही कोण शत्रू व कोण मित्र शेवटपर्यंत कळणार नाही. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, तसेच काका पुतण्यामध्ये आलेली कटुता हे सानेंच्या अंदाजाला खरे ठरवणारे प्रसंग आहेत.

sharad pawar nifad nashik
दिंडोरीच्या यशानंतर शरद पवारांची निफाडमध्ये मोर्चेबांधणी, आमदार दिलीप बनकर यांच्या अडचणीत वाढ
Amol Kirtikar challenge to Ravindra Waikar MP
वायकर यांच्या खासदारकीला अमोल कीर्तिकरांचे आव्हान
Bhagirath Bhalke meet Sharad Pawar
भगीरथ भालके शरद पवारांच्या भेटीला, घरवापसीच्या चर्चांना उधाण, पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार?
Ajit Pawar vilas lande
अजित पवारांच्या चिंता वाढली? आमदार विलास लांडे शरद पवारांच्या संपर्कात? जवळचा मित्र म्हणाला, “त्या भेटीनंतर…”
leaders photo missing from rohit patil birthday hoarding
आमदारपुत्र रोहित पाटलांच्या वाढदिनी शुभेच्छा जाहिरात फलकावरुन वरिष्ठ नेत्यांची फोटो गायब
Minister Khade, close relative,
पालकमंत्री खाडे यांच्या विरोधात त्यांच्या निकटवर्तीयाचाच उमेदवारीचा दावा
mahant raju das ayodhya
भाजपाच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवरून अयोध्येच्या महंतांचा जिल्हाधिकार्‍यांशी वाद; कोण आहेत महंत राजू दास?
in twelve ministerial constituencies the Grand Alliance is lagging behind
बारा मंत्र्यांच्या मतदारसंघांत महायुती पिछाडीवर

अजित पवारांना शनीचा अडथळा!

याशिवाय साने पुढे म्हणाले होते की, अजित पवारांना सध्या साडेसाती सुरू असून, चंद्रा वरुन होणारे शनी भ्रमण मंगळ व प्लुटोच्या प्रतीयोगातून होत असल्याने, त्यांना वाढत्या अडचणींचा सामना सातत्याने करावा लागत आहे. सत्तेचा कारक रवी हा मूळ कुंडलीत राहूच्या केंद्रात असल्याने, एक संभ्रमाचे वातावरण सातत्याने तयार होत असते. घेतलेल्या निर्णयात भावनिकता अधिक दिसून येते. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणं हे याचंच उदाहरण ठरू शकतं.

या निर्णयाच्या प्रभावाविषयी सुद्धा साने यांनी भविष्यवाणी केली होती. ते म्हणाले होते की, मकर राशीत असलेल्या प्लुटोमुळे सत्तेचा कारक रवी पूर्ण बाधीत झाला आहे. मेष राशीत असलेला हर्षल हा अजित पवारांच्या मूळ कुंडलीतील गुरु-बुध यांच्या अशुभयोगातून जात असल्याने, जे ठरवले आहे, त्याप्रमाणे घडून येत नाही. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता अजित पवारांना अपेक्षित असलेले यश प्राप्त होण्याची शक्यता कमी दिसतेय.

हे ही वाचा<< “२०२७ पर्यंत पुन्हा..”, उद्धव ठाकरेंसाठी मोठी भविष्यवाणी; कुंडलीतील बदलाचं लोकसभेच्या निकालातील प्रतिबिंब पाहा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी ज्योतिष तज्ज्ञ काय सांगतात..

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुद्धा अत्यंत नाजूक झाली आहे. कुंभ राशीतील शनी भ्रमण, मेष राशीतील राहू भ्रमण, मकर राशीतील प्लुटो चे भ्रमण हे पक्षापुढे असंख्य अडचणी वाढवू शकते. या पाप ग्रहांचा अडथळा पक्षाला अगोदर पार करावा लागणार आहे. तरीही, पक्षातील फूट रोखण्यात नेतृत्वाला अपयश येईल अशी शक्यता दिसते आहे. दरम्यान, मीन राशीतील शनी पासून पक्षाची पुढील वाटचाल पाहणे खूपच औत्सुक्याचे असेल.