scorecardresearch

Premium

दिवाळीपूर्वी ‘या’ राशींच्या लोकांचे नशीब पालटणार? केतू राशी परिवर्तन करताच अमाप संपत्ती मिळण्याची शक्यता

केतू राशी परिवर्तन करताच ‘या’ राशींचे लोक दिवाळीपूर्वी होणार मालामाल?

ketu Rashi Parivartan
दिवाळीपूर्वी 'या' राशींचे अच्छे दिन? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Ketu Gochar 2023: या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. जे ज्योतिषशास्त्रात खूप महत्वाचे मानले जाते. ग्रहांच्या बदलत्या चालीचा परिणाम माणसांच्या जीवनावर होतो. अशातच आता केतू लवकरच त्याची चाल बदणार आहे. ज्याचा शुभ आणि अशुभ परिणाम काही राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. ३० ऑक्टोबर रोजी केतू त्याच्या वक्री चालीने कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे केतुची ही वक्री चाल कोणत्या राशीसाठी भाग्यवान ठरू शकते ते जाणून घेऊ या.

धनु रास –

केतुचा कन्या राशीत प्रवेश धनु राशीच्या लोकांसाठी शुभ ठरु शकतो. उद्योगपतींसाठी हा काळ चांगला ठरु शकतो. या काळात तुमच्याकडे पैसा येऊन तुमची कर्जातून मुक्तता होऊ शकते. तसेच तुम्ही कुटुंबाबरोबर प्रवासाला जाण्याचा प्लॅन करु शकता. तर गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ मानला जात आहे.

सिंह रास –

सिंह राशीच्या लोकांसाठी केतू गोचर लाभदायक ठरु शकते. केतुच्या शुभ प्रभावामुळे व्यावसायिकांना नफा मिळण्याची शक्यता आहे. तसेच या काळात तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते. तणावमुक्त आणि आनंदी राहण्यासाठी निसर्गात वेळ घालवू शकता. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची जास्त काळजी घेऊ शकता.

हेही वाचा- ८ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ राशींच्या कुंडलीत बदलाचे संकेत; तुमच्या राशीची नाती, नोकरी व पैशाची गणितं कशी सुटणार?

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांना केतुच्या गोचरचा फायदा होऊ शकतो. सरकारी नोकरी करणाऱ्यांना या काळात चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांची परिस्थिती चांगली राहू शकते पूर्वीच्या तुलनेत आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. या काळात तब्येतीची काळजी घ्या.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Before diwali 2023 the fate of the people of these zodiac signs will change ketu changes the sign there is a possibility of getting immense wealth jap

First published on: 01-10-2023 at 19:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×