आषाढ महिन्यानंतर १४ जुलैपासून श्रावण महिना सुरु होणार आहे. हा महिना भगवान शंकराला समर्पित असून श्रावणात शंकराची पूजा आणि उपासना करण्याला खूप महत्त्व आहे. या महिन्यात शंकराची आराधना केल्याने ते प्रसन्न होतात असे म्हटले जाते. अशा काही गोष्टी आहे ज्या श्रावण महिन्यात शंकराला अर्पण केल्याने ते त्वरीत प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. जाणून घेऊया या गोष्टी कोणत्या आहेत.

  • बेलाची पाने

ज्योतिष शास्त्रानुसार श्रावण महिन्यात विधिवत पूजा केल्याने महादेवाचा आशीर्वाद मिळतो. पूजेच्या वेळी शिवलिंगावर बेलाची पाने अर्पण करा. महादेवाच्या पूजेमध्ये बेलाचे पान आणि अभिषेक करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. श्रावण महिन्यात शिवलिंगावर नियमितपणे बेलाचे पान अर्पण केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.

Ketu Nakshatra Gochar 2024 Ketu Transit In Hasta Nakshatra Positive Impact On These Zodiac Sign
छाया ग्रह केतूची ‘या’ राशींवर होईल कृपा! नक्षत्र बदलानंतर येतील आनंदाचे दिवस! उत्पन्न वाढवण्याची मिळेल संधी
success story of ias saumya sharma
परीक्षेच्या दिवशीच बिघडली तब्येत, तरीही मानली नाही हार, वाचा IAS सौम्या शर्माचा प्रेरणादायी प्रवास
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : १२ महिन्यानंतर गुरू राशीमध्ये प्रवेश करणार सूर्यदेव, ‘या’ राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ
  • केसर

भगवान शंकराची आराधना करून त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रावण महिना खास आहे. असे मानले जाते की शिवलिंगावर केसर अर्पण केल्याने व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते. तसेच शिवाला साखरेचा अभिषेक केल्याने व्यक्तीला सुख-समृद्धी प्राप्त होते. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातून गरिबी नष्ट होते.

  • शमीची पाने

श्रावणात व्रत आणि उपासना केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात असे मानले जाते. या महिन्यात शमीची पानेही भगवान शंकराला अर्पण करू शकतात. शिवाला शमीची पाने खूप आवडतात. त्यामुळे महिनाभर शमीची पाने शिवलिंगावर लावावीत. याने शिवाची कृपा प्राप्त होते.

  • दूध-गंगाजलाने अभिषेक

श्रावणी सोमवारी उपवास केल्याने अविवाहित मुलींना योग्य वर मिळतो. दुसरीकडे, विवाहित महिलांचे वैवाहिक जीवन सुखी राहते. श्रावण महिन्यात दूध आणि गंगाजलाने केलेल्या अभिषेकालाही विशेष महत्त्व आहे. यामुळे शुभ परिणाम मिळतात. असे मानले जाते की शंकराला दूध आणि गंगाजलाने अभिषेक करणे आवडते.

  • अत्तर, चंदन आणि भांग

वर नमूद केलेल्या वस्तूंसोबतच अत्तर, चंदन, भांग, दूध, दही, मध, तूप, केशर इत्यादींचाही भगवान शंकराला श्रावण महिन्यात नैवेद्य दाखवावा. हे सर्व एकत्र करून शिवलिंगाला अर्पण करावे. यामुळे शिव लवकरच प्रसन्न होतो.

  • सुवासिक ताजी फुले

असे मानले जाते की सर्व देवतांमध्ये भगवान शिवाचे स्थान सर्वोच्च आहे. शास्त्रानुसार भगवान शिवाला कण्हेरीची फुले खूप आवडतात. अशा स्थितीत पूजेच्या वेळी शिवाला हे फूल अर्पण करावे. याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)