आषाढ महिन्यानंतर १४ जुलैपासून श्रावण महिना सुरु होणार आहे. हा महिना भगवान शंकराला समर्पित असून श्रावणात शंकराची पूजा आणि उपासना करण्याला खूप महत्त्व आहे. या महिन्यात शंकराची आराधना केल्याने ते प्रसन्न होतात असे म्हटले जाते. अशा काही गोष्टी आहे ज्या श्रावण महिन्यात शंकराला अर्पण केल्याने ते त्वरीत प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. जाणून घेऊया या गोष्टी कोणत्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • बेलाची पाने

ज्योतिष शास्त्रानुसार श्रावण महिन्यात विधिवत पूजा केल्याने महादेवाचा आशीर्वाद मिळतो. पूजेच्या वेळी शिवलिंगावर बेलाची पाने अर्पण करा. महादेवाच्या पूजेमध्ये बेलाचे पान आणि अभिषेक करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. श्रावण महिन्यात शिवलिंगावर नियमितपणे बेलाचे पान अर्पण केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beloved month of lord shiva will start from 14th july make mahadev happy by offering these special things pvp
First published on: 01-07-2022 at 16:26 IST