Bhadra Mahapurush Rajyoga 2026 : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ग्रहांचा राजकुमार ‘बुध’ स्वतःच्या ‘मिथुन’ राशीत विराजमान असणार आहे. यामुळे ‘भद्र महापुरुष राजयोग’ निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, पाच महापुरुष योगांपैकी एक असलेला ‘भद्र योग’ अत्यंत शुभ मानला जातो. हा योग आयुष्यात धन, समृद्धी आणि प्रगती घेऊन येतो.
बुध ग्रह सध्या स्वतःच्या मिथुन राशीत स्थित असून तो ५ ऑगस्टपर्यंत याच राशीत राहील. ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीतील बुधाची उपस्थिती अत्यंत लाभदायक मानली जाते, कारण यामुळे भद्र योग आकार घेतो. ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत या योगाचा प्रभाव विशेषतः तीन राशींसाठी अत्यंत फलदायी ठरणार असून, त्यांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
‘या’ ३ राशींचे भाग्य उजळणार
१. मिथुन
भद्र योग मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती (Promotion) मिळण्याची दाट शक्यता आहे. एखद्या मोठ्या कंपनीकडून आकर्षक नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यापाऱ्यांना व्यवसायात भरघोस नफा होईल. समाजात मान-सन्मान वाढेल आणि प्रलंबित कामे वेगाने पूर्ण होतील. जुन्या गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
२. कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. अचानक धनलाभाच्या संधी निर्माण होतील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. जर तुम्ही नवीन घर, मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. दीर्घकाळापासून अडकलेली कामे मार्गी लागतील. या काळात धार्मिक यात्रेचा योग आहे आणि वडिलोपार्जित मालमत्तेतून मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.
३. धनु
धनु राशीच्या लोकांसाठी भद्र महापुरुष राजयोग अत्यंत लाभदायक सिद्ध होईल. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बळकट होईल आणि अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या कर्जातून मुक्ती मिळू शकते. भागिदारीत (Partnership) चालणाऱ्या व्यवसायातून चांगला नफा मिळेल. दूरचे व्यावसायिक दौरे फायदेशीर ठरतील. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
