Bhadra Rajyog 2026 Impact : बुध देव ७ सप्टेंबर २०२६ ते २४ सप्टेंबर २०२६ या काळात कन्या राशीत असणार आहेत. पंचमहापुरुष राजयोगांपैकी एक असलेला भद्रा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. या काळात वृषभ, मिथुन, कन्या, धनु आणि मकर राशीच्या लोकांना करिअर, व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मोठे यश व धनलाभ मिळण्याची शक्यता आहे.
भद्रा राजयोगाचे महत्त्व आणि प्रभाव
ज्योतिषशास्त्रात बुधाला बुद्धिमत्ता, संवादकौशल्य, तर्कशास्त्र आणि अर्थव्यवस्थेचा कारक मानले जाते. या राजयोगामुळे निर्णयक्षमता आणि संवादकौशल्य सुधारते.
या शुभ योगामुळे व्यापार, मीडिया, आयटी, बँकिंग आणि लेखन क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना प्रगतीच्या नवीन संधी आणि मान-सन्मान मिळतो. थकीत पैसे परत मिळण्याची आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होण्याची दाट शक्यता निर्माण होते.
‘या’ ५ राशींचा वाढणार बँक बॅलन्स
वृषभ :
बुधाचे हे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरेल, या काळात जुन्या गुंतवणुकीतून अचानक पैसा मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहील.
मिथुन :
मिथुन राशीचा स्वामी स्वतः बुध आहे. या काळात नवीन घर, गाडी किंवा जमीन खरेदीचे योग आहेत. कौटुंबिक जीवनात सुख-शांति राहील.
कन्या :
बुध ग्रह कन्या राशीत गोचर करत असल्याने या राजयोगाचा सर्वाधिक फायदा तुम्हालाच होईल. आत्मविश्वासात वाढ होईल, व्यापारात मोठे व्यवहार पूर्ण होतील आणि नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे.
धनु :
भद्र राजयोग धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरु शकतो. या काळात कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल. नवीन नोकरी किंवा इच्छित बदलीस अनुकूल काळ आहे.
मकर :
मकर राशीच्या नवव्या स्थानात (भाग्य स्थान) हा योग बनत आहे. या काळात अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतील. धार्मिक कार्याची आवड वाढेल आणि व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरतील.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
