Bhadra Rajyoga 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. बुद्धी आणि व्यवसायाचा कारक असलेला बुध ग्रह आता मूळ त्रिकोण राशी मिथुनमध्ये विराजमान आहे. याचा प्रभाव राशी चक्रातील बारा राशींवर दिसून येत आहे. त्याचबरोबर मिथुन राशीमध्ये भद्र राजयोग निर्माण करून तीन राशींवर त्यांची कृपा दिसून येत आहे. या राशीच्या लोकांना येत्या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो. जाणून घेऊ या, त्या तीन राशी कोणत्या?

जर बुध मिथुन किंवा कन्या राशींच्या १-४-१० व्या स्थानावर आहे, तर तेव्हा भद्र राजयोग निर्माण होतो. या राशींच्या लोकांच्या कुंडलीमध्ये योग निर्माण होत आहे. त्यांना सुख समृद्धीबरोबर प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. त्यांचे आरोग्य उत्तम राहील आणि अचानक पितृ संपत्तीचा लाभ होऊ शकतो.

हेही वाचा : ८ जुलैपासून लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ राशींच्या जीवनात असेल राजयोग? १८ वर्षानंतर राहूच्या नक्षत्र बदलाने अचानक पालटू शकते नशीब

मेष राशी

मेष राशीच्या तिसऱ्या स्थानावर हा राजयोग निर्माण होत आहे. यामुळे या राशींचे लोक बुद्धी कौशल्याच्या जोरावर त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती करतील. यामुळे त्यांच्या कामामुळे त्यांचे बॉस खूश होतील आणि त्यांना याचा फायदा होऊ शकतो. जर या राशीचे लोक व्यवसाय करत असेल तर त्यांना मोठा लाभ होऊ शकतो. या लोकांना नशीबाची चांगली साथ मिळेल.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या धन स्थितीमध्ये भद्र राजयोग निर्माण होत आहे. याचा फायदा वृषभ राशीच्या लोकांना दिसून येईल. हे लोक आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतात. या लोकांच्या संवाद कौशल्यामुळे अनेक लोक यांच्याकडे आकर्षित होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी या लोकांचे ऐकून घेतले जाईल. या लोकांना मोठे प्रोजेक्ट मिळू शकतात जे भविष्यात करिअरच्या दृष्टीकोनातून फायदेशीर ठरू शकतो.

हेही वाचा : ३० जूनपासून भरभराटीचे दिवस; शनिदेवाच्या कृपेने ‘या’ चार राशींची होणार चांदी

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लग्न स्थानावर हा राजयोग निर्माण होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांचे समाजात एक वेगळे स्थान निर्माण होईल आणि या लोकांच्या संवाद कौशल्यामुळ लोक प्रभावित होतील. यामुळे तुमचे बिघडलेले काम पूर्ण होतील. वैवाहित जीवनात सुख लाभेल. ज्या लोकांचा विवाह झाला नाही त्यांचे विवाहाचे योग जुळून येईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)