Rashi Bhavishya 12 September 2026 In Marathi : आज १२ सप्टेंबर २०२६ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी असणार आहे. आज उत्तराफाल्गुनी नक्षत्र जागृत होईल आणि शुभ योग जुळून येणार आहे. राहू काळ ९ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ११ वाजून ३ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजात मुहूर्त १२ वाजून १० मिनिटांपासून सुरु होईल ते १२ वाजून ५९ मिनिटांपर्यंत असणार आहे. आजपासून भाद्रपद महिना सुरु होणार आहे. तुमच्यासाठी हा महिना काय घेऊन येणार जाणून घेऊयात.

आजचे पंचांग व राशिभविष्य, १२ सप्टेंबर २०२६ (Dainik Rashi Bhavishya 12 September 2026 In Marathi )

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

चांगली बातमी समजेल. खेळ व मनोरंजन यात वेळ निघून जाईल. कटू प्रसंगाचे रूपांतर गोडव्यात कराल. अति विचार करत राहू नये. जोडीदाराचे सहकार्य अपेक्षित राहील.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

जोडीदार तुमच्यावर खुश राहील. जवळच्या प्रवासाची संधी मिळेल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. सामाजिक बांधीलकी विसरून चालणार नाही. भावंडांसोबत अनमोल क्षण घालवाल.

दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

चालत आलेली संधी ओळखा. जोडीदाराकडून आश्चर्यचकित केले जाईल. कामातून समाधान मिळेल. मित्रांचा रोष गोडीने कमी करावा. मन प्रसन्न राहील.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

मुलांसाठी चांगला काळ आहे. नवीन नोकरी शोधात असणार्‍यांना यश येईल. आपल्या कर्तुत्वाला भरारी घेता येईल. हातात नवीन अधिकार येतील. मुलांच्या जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

आत्मविश्वासाने निर्णय घ्या. नोकरीमध्ये चांगला काळ असेल. आपल्या तब्येतीप्रमाणे खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. व्यापार्‍यांच्या प्रयत्नाला यश येईल. विरोधक नामोहरम होतील.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस. आपले मत उत्तमरीत्या मांडू शकाल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. मेहनत, आणि प्रयत्न यांची कास सोडू नये.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

बोलण्यातून इतरांची माने जिंकाल. संपूर्ण दिवस धावपळीत जाईल. दिवसाची सुरुवात उत्साहात कराल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. झोपेची तक्रार जाणवेल.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

आजचा दिवस मनासारखा जाईल. जुनी येणी वसूल होतील. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. एखादी जुनी समस्या संपुष्टात येईल.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

मनातील नसत्या शंका काढून टाकाव्यात. खर्चावर नियंत्रण ठेवा. विरोधक परास्त होतील. कार्यालयात प्रशंसेस पात्र व्हाल. क्रोधवृत्तीत वाढ होईल.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

जुनी खोळंबलेली कामे मार्गी लागतील. इतरांच्या विश्वासाला खरे उतरा. आर्थिक पातळीवर यशकारक दिवस. मिळकतीच्या बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

नोकरी-व्यवसायात सन्मान मिळेल. दिवस धावपळीत जाईल. भावंडांची मदत मोलाची ठरेल. मन प्रसन्न राहील. नवीन ओळख वाढवावी.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. घरातील महत्त्वाच्या कामात हातभार लावाल. गोड शब्दात मत मांडावे. शक्यतो नातेवाईकांशी व्यवहार टाळावेत. चांगल्या गोष्टीसाठी खर्च कराल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर