Rashi Bhavishya 31 december 2025 In Marathi : आज ३१ डिसेंबर २०२५ रोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. त्याचबरोबर साध्य योग जुळून येईल आणि कृतिका नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ०४ मिनिटांपर्यंत असेल. आज भागवत एकादशी असणार आहे. तर वर्षाचा शेवटचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाणार जाणून घेऊयात…

दैनिक पंचांग व राशिभविष्य, ३१ डिसेंबर २०२५ (Dainik Rashi Bhavishya In Marathi 31 December 2025 )

आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope Today In Marathi)

जोडीदाराच्या दिलदार वृत्तीची प्रशंसा करा. कोणाकडून फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये. नवीन गोष्टी आमलात आणाव्यात.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope Today In Marathi)

उगाचच भांडणात पडू नका. घरात खबरदारी घेऊन काम करावे. मन शांत ठेवून कार्यरत राहावे. कार्यालयीन सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता. धैर्याने परिस्थिती हाताळावी.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope Today In Marathi)

मनातील चुकीच्या विचारांना हद्दपार करा. आपली उपासना सफल होईल. आजचा दिवस चांगला जाईल. घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळेल.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope Today In Marathi)

स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. वडीलधार्‍या मंडळींची काळजी घ्यावी. दिनक्रम व्यस्त राहील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. समोरच्या व्यक्तिमधील चुका काढत बसू नका.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope Today In Marathi)

घरात शांततेचे वातावरण राहील. नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील. आवडत्या वस्तु खरेदी कराल. संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope Today In Marathi)

कष्टाच्या मानाने यश पदरी पडेल. स्पर्धेत यश मिळवाल. कामानिमित्त प्रवास घडेल. सर्वत्र आनंद शोधाल. अचानक खर्च उद्भवू शकतात.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope Today In Marathi)

अनावश्यक खर्च कमी करा. नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका. मित्रांचे सहकार्य लाभू शकेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. अधिकारात वृद्धी होईल.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope Today In Marathi)

केलेला संकल्प पूर्ण होईल. आपले विचार लोकांसमोर मांडाल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतील. एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड संभवते. अनावश्यक खर्च उद्भवतील.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope Today In Marathi)

आपला आत्मविश्वास कायम ठेवा. घरासंबंधीची कामे पूर्ण करा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भौतिक गोष्टींचा अनुभव घ्याल. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope Today In Marathi)

आपला संयम कमी येईल. अति साहस दाखवू नका. आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा. व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope Today In Marathi)

कामाकडे संपूर्ण लक्ष द्या. छोटे प्रवास संभवतात. बोलण्यातून लोकांशी जवळीक साधाल. व्यवसाईकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. मनातील नवीन योजनांचा पाठपुरावा करावा.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope Today In Marathi)

नवीन संधी चालून येऊ शकते. लहान प्रवास कराल. मन काहीसे विचलीत राहण्याची शक्यता. पदोन्नतीचे योग संभवतात. घरात अतिथी जमतील.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर