Bhaibeej 2026 : भाऊ-बहिणीच्या अतुट प्रेमाचा, स्नेहाचा आणि विश्वासाचा सण असलेल्या ‘भाऊबीज’ बाबत अनेकांचा संभ्रम असतो. हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या माथ्यावर तिलक लावून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, सुख-समृद्धीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतात.
धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी विधीनुसार पूजा केल्याने आणि बहिणीच्या हातून तिलक करून घेतल्याने भावाला यमराजच्या भीतीपासून मुक्ती मिळते. चला तर मग जाणून घेऊया यंदा भाऊबीज नेमकी कधी आहे, तिलक करण्याचा शुभ मुहूर्त आणि या सणाचे महत्त्व.
भाऊबीज २०२६ कधी आहे? (When is Bhaibeej 2026)
पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी १० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता सुरू होईल आणि ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजमून ५३ मिनिटांपर्यंत राहील. उदया तिथिनुसार यंदा हा सण ११ नोव्हेंबर २०२६, बुधवारी साजरा करणे शास्त्रसंमत ठरणार आहे.
भाऊबीज शुभ मुहूर्त (Bhaibeej Shubh Muhurat)
पंचांगानुसार, ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीजेचा तिलक करण्यासाठीचा शुभ काळ खालीलप्रमाणे असेल:
शुभ मुहूर्त: दुपारी १:१० मिनिटे ते दुपारी ३:२० मिनिटांपर्यंत.
या वेळेत बहिणी आपल्या भावाच्या माथ्यावर टिळा लावून औक्षण करू शकतात.
भाऊबीजेचे धार्मिक महत्त्व (Religious Significance)
शास्त्रानुसार, कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. याला ‘यम द्वितीया’ असेही म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी मृत्यूचे देवता यमराज आपल्या बहीण यमुनेच्या घरी गेले होते. यमुनेने त्यांचे मनापासून स्वागत केले, तिलक लावला आणि भोजन दिले. बहिणीच्या या प्रेमाने प्रसन्न होऊन यमराज यांनी त्यांना वरदान दिले की, जो भाऊ या दिवशी आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिच्याकडून टिळा लावून घेईल, त्याला सुख-समृद्धी आणि कल्याणाचे वरदान लाभेल. याच मान्यतेमुळे भाऊबीजेला तिलक करण्याची परंपरा सुरू झाली.
