Horoscope Today 8 September 2026 In Marathi : आज ८ सप्टेंबर २०२६ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी दुपारी २ वाजून ४४ मिनिटांनी असणार आहे. संध्याकाळी ४ वाजून ४० मिनिटांपर्यंत पुष्य नक्षत्र जागृत होईल आणि रात्री ३ वाजून ३८ मिनिटांपर्यंत वरियन योग जुळून येणार आहे. राहू काळ ५ वाजून १६ मिनिटांनी सुरु होईल ते ६ वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. आज भौम प्रदोष असणार आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असणार चला जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, ८ सप्टेंबर २०२६ (Today Horoscope 8 September 2026 In Marathi )
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
व्यवसायात स्वत:च अस्तित्व निर्माण कराल. शांत पद्धतीने केलेली कामे यश देतील. गरजूंना मदत कराल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील. भावंडांशी नाते दृढ होईल.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
अनपेक्षित लाभ होतील. तुमच्यावर शंका घेतली जाईल असे वागू नका. कर्ज व्यवहार टाळावेत. व्यवसाय विस्ताराचा विचार कराल. कामात क्षुल्लक समस्या येऊ शकतात.
दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
अचानक लाभाची शक्यता. जुन्या प्रश्नांची उकल होईल. जोडीदार तुमच्यावर खुश होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. हित शत्रूंच्या कारवाया वाढतील.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
घरात चांगले कार्य घडेल. समोरच्याचे वर्चस्व राहील. वरिष्ठ अधिकार्यांचा पाठिंबा मिळेल. ज्येष्ठ अधिकार्यांची गाठ पडेल. प्रेमसंबंध मानसिक शांतता प्रदान करतील.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
सर्वांशी सामंजस्याने वागाल. भागीदारीत काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत. आपले स्पर्धक त्रास देऊ शकतात. आत्मविश्वास वाढीस लागेल. झालेल्या लाभाची वाच्छता करू नये.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
घरातील कामात आनंद मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. जुनी समस्या संपुष्टात येईल. प्रलंबित कामे यशस्वीरित्या मार्गी लागतील. दिवसाचा उत्तरार्ध मित्रांसोबत घालवाल.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
अपेक्षित उत्तराची प्रतीक्षा संपेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. कार्यक्षेत्रात जोखीम पत्करताना सावधानता बाळगा. कर्जाचे व्यवहार टाळावेत. कामावर अधिक लक्ष केंद्रीत करावे.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
व्यवसायात पुढारीपणा दाखवाल. गोड बोलून कामे करून घ्याल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नियोजन व कौशल्य पणाला लागू शकते. कामाच्या ठिकाणी वादात पडू नका.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
घरातील वातावरण आनंददायी असेल. मोठ्या वस्तूंची खरेदी होईल. अधिकारी वर्गाकडून पूर्ण सहयोग मिळेल. पालकांच्या सल्ल्यानेच कामे करावीत. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
समोरच्यावर एकदम विश्वास ठेऊ नका. विद्यार्थ्यांनी चिकाटी सोडू नये. लाभ पदरात पडून घ्यायला धावपळ होईल. काही सकारात्मक वार्ता मिळतील. मानसिक तणाव निवळतील.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
संभ्रमात कोणतेही काम करू नका. एकाच वेळी अनेक कामे सामोरी येतील. जुनी कामे मार्गी लागतील. प्रवास जपून करावा. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्या.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
नवीन अधिकार हातात येतील. खाण्यावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक विस्तारासाठी अनुकूल काळ. कौटुंबिक जबाबदार्या उत्तमरीत्या पार पाडाल. विवाह इच्छुकांना पुढील बोलणीसाठी अनुकूल दिवस.
