Astrology Predictions For May 2024: १ मे २०२४ पासून अनेक मोठ्या ग्रहांचे राशी व नक्षत्र परिवर्तन होणार आहे. अगदी महिन्याच्या पहिल्याच दिवशी बृहस्पती गुरु आपला मित्र ग्रह मंगळाची मेष रास सोडून कृतिका नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्यात व दैत्यगुरू शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. १४ मे पर्यंत गुरु वृषभ राशीत असणार आहे. गुरु वृषभ राशीत असतानाच कृतिका नक्षत्रात दुसरा, तिसरा व चौथा टप्पा सुद्धा पार करणार आहे. त्यानंतर गुरु रोहिणी नक्षत्र व मृगशिरा नक्षत्रातून पहिला व दुसरा टप्पा पार करून पुढे चालणार आहे. कृतिका नक्षत्राचा स्वामी सूर्य, रोहिणी नक्षत्राचा स्वामी चंद्र व मृगशिरा नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे. सूर्य, चंद्र व मंगळाचे गुरूंसह मित्रत्वाचे नाते आहे. त्यामुळे गुरुचे या तिन्ही नक्षत्रातील गोचर काही राशींवर शुभ प्रभाव टाकणार आहेत. तसेच शुक्राला दैत्यगुरू व बृहस्पतीला देवगुरु म्हटले जाते. त्यामुळे एका गुरुचे दुसऱ्या गुरूच्या राशीतील गोचर सकारात्मक प्रभाव वाढवणार आहे. हा शुभ प्रभाव व लाभ नक्की कोणत्या राशीला लाभ अनुभवण्याची संधी देणार व कुणाचे नुकसान घडवून आणणार याचा आढावा घेऊया..

मे महिन्यातील नशीबवान राशी कोणत्या?

बृहस्पती गुरुचे गोचर पाच राशींना लाभदायक संधी उपलब्ध करून देणार आहेत, यामुळे मे महिन्यात या पाच राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहेत. या पाच राशींमध्ये वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक व मकर यांचा समावेश आहे. या पाचही राशींना धनलाभाचे योग आहेत. वाडवडिलांच्या रूपात, जुन्या गुंतवणुकीतून, भावंडांच्या माध्यमातून व जोडीदाराच्या साथीने या पाच राशींना आर्थिक लाभाची दारे उघडणार आहेत. आरोग्यात सुद्धा सुधार दिसून येऊ शकते, एखादा जुना आजार तुमची पाठ सोडेल. तुमच्या माध्यमातून समाजातील गरजूंना मदत होऊ शकते ज्यामुळे या कालावधीत मानसिक समाधान लाभू शकते. एखादी उन्हाळी सहल सुद्धा यशस्वी होईल.

हे ही वाचा<< १ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती

मे महिन्यात ‘या’ राशींनी राहावे सावध!

मेष, मिथुन, तूळ, धनु, कुंभ या राशींच्या मंडळींना सावध राहण्याची गरज आहे. गुरु परिवर्तनाच्या वेळी तुमच्या जीवनात काही प्रमाणात उलथापालथ होऊ शकते. गुंतवणूक, खासगी आयुष्यात तुमची शारीरिक व मानसिक शक्ती खर्ची घालावी लागेल अशा स्थिती येऊ शकतात. मन शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा किंवा उपासना करण्यावर भर द्या. लहान लहान गोष्टींनी चिडचिड होऊ शकते, वाणीवर नियंत्रण ठेवा.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)